
माहूरच्या 'रेणुका माता मंदिरातील तांबुल प्रसादाला मिळाला मानाचा GI Tag, आयुर्वेदिक चौदा घटकांचे मिश्रण असलेला पौष्टिक पदार्थ
साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेले तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामधील देवीच्या नैवेद्याला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केला आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादामध्ये दिल्या जाणाऱ्या लाडू नंतर आता जीआय मानांकन मिळवणारा दुसरा प्रसादाचा मान रेणुका माता तांबुलला देण्यात आला आहे. मंदिराला मिळलेल्या या यशामुळे माहूरच्या धार्मिक पर्यटनाला जागतिक स्तरावर एक मोठी गती मिळाली आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
श्री रेणुका मातांनी त्यांचे निस्सीम भक्त श्री विष्णुकवी महाराजांना स्वप्नात दृष्टांत देऊन तांबुलाचा नैवेद्य सुरु करण्याची देवी आज्ञा दिली होती. त्यानंतर मंदिरात दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत तांबुल तयार करण्याचे कार्य अजूनही सुरु आहे. अमोल गावंडे, पांडुरंग राठोड, विशाल चौधरी, संतोष परळकर, अनिल परळकर, अभिषेक परळकर आणि लवकुश जाधव ही सात पारंपरिक सेवेकरी कुटुंबे देवीच्या प्रसादाचा आणि पूजेचा वारसा परंपरा पिढ्यानपिढ्या जपण्याचे पवित्र कार्य करत आहेत. मंदिरामध्ये दिला जाणारा नैवेद्यातील प्रसाद नसून शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे.
तांबुल बनवण्यासाठी चौदा विविध आयुर्वेदिक पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. GI Tag मिळवण्यासाठी तांबुलाचा इतिहास, परंपरा, सांस्कृतिक संदर्भ, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि तांबुलाची अस्सल ओळख इत्यादी अनेक पुरावे सरकारकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर जवळपास तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून मानांकन प्राप्त झाले आहे. चला तर जाणून घेऊया तांबुल बनवण्याची रेसिपी.
Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
रेणुका माता मंदिरात तांबुल बनवण्यासाठी नागवेलीची पाने, कात, चुना, सुपारी, सोप, लवंग, वेलची, जायफळ, जायपत्री, ओवा, धनेदाळ, आस्मान तारा, ज्येष्ठमध आणि चमनबार अशा एकूण १४ पदार्थांचा वापर केला जातो. हे सर्व पदार्थ एका दगडी खलबत्यामध्ये एकत्र करून बारीक वाटले जाते. त्यामुळे तांबुल हा केवळ प्रसाद नसून मानवी आरोग्यासाठी आणि पचनक्रियेसाठी अतिशय महत्वपूर्ण मानला जाणारा पदार्थ आहे. माहूरचा रेणुका माता तांबुलला आंतरराष्ट्रीय कायदेशीर संरक्षण मिळाल्यामुळे बाजारातील बनावट उत्पादनांना आळा बसणार आहे. विविध औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या प्रसादाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतील.