Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Zilla Parishad : धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

धाराशिव जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्ग-४ संवर्गातील ५६ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३७ जणांची आरोग्य सेवक, १६ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि ३ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर नियुक्ती करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 18, 2026 | 04:55 PM
धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

धाराशिव ZPचा महत्त्वाचा निर्णय; ३७ आरोग्य सेवक, १९ कनिष्ठ सहाय्यक पदांवर पदोन्नती

Follow Us
Follow Us:
  • अखेर पदोन्नतीचा मुहूर्त!
  • जिल्हा परिषदेतील ५६ कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम
  • अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वर्ग-४ कर्मचाऱ्यांना न्याय
  • पारदर्शक समुपदेशनातून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेतील वर्ग-४ संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ रखडलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करत जिल्हा परिषद प्रशासनाने एकूण ५६ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ दिला आहे. पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हिडिओ चित्रीकरणाच्या साक्षीने समुपदेशन प्रक्रिया

जिल्हा परिषदेच्या स्थायी सभागृहात संपूर्ण समुपदेशन (कौन्सेलिंग) प्रक्रिया व्हिडिओ चित्रीकरणाच्या साक्षीने पार पडली. राज्य शासनाच्या नियमावलीनुसार सेवाज्येष्ठता, कर्मचाऱ्यांचे विकल्प आणि उपलब्ध रिक्त पदे यांचा विचार करून पदोन्नती निश्चित करण्यात आली.

५६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली.

Dharashiv ZP Election Result 2026: धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा …

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये:

३७ कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवक पदावर नियुक्ती

१६ कर्मचाऱ्यांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदावर नियुक्ती

३ कर्मचाऱ्यांची कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर नियुक्ती

अशा एकूण ५६ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला.

सामान्य प्रशासन विभागाची महत्त्वाची भूमिका

ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रवीण खरसाडे, विजया सोनटक्के आणि विनोद गायकवाड यांनी रिक्त पदांचा ताळमेळ, आवश्यक माहितीचे संकलन आणि प्रशासकीय समन्वय साधत संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पारदर्शक आणि नियमानुसार पदोन्नती प्रक्रिया राबवल्याबद्दल विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.

Dharashiv ZP Politics: धाराशिवच्या ‘शिंदे सेनेत’ उभी फूट! सभापती पदावरून …

Web Title: Dharashiv zilla parishad 56 class 4 employees promoted after long wait

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
1

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
2

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
4

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.