Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती

Shahu Maharaj Birth Anniversary : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धाराशिव येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयाने शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार 26 जून रोजी साजरी होणारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती 25 जूनलाच साजरी केल्याने वाद निर्माण झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2026 | 05:43 PM
शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली शाहू महाराज जयंती

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली शाहू महाराज जयंती

Follow Us
Follow Us:
  • शासन आदेशाला हरताळ?
  • राजर्षी शाहू महाराजांची जयंती एक दिवस आधीच साजरी
  • सामाजिक न्याय विभागाच्या मनमानीची चौकशीची मागणी
धाराशिव :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धाराशिव येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती २६ जूनऐवजी २५ जून रोजीच साजरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार आणि सामाजिक न्याय विभागाच्या निर्देशांनुसार जयंती २६ जून रोजीच साजरी करणे अपेक्षित असताना, एक दिवस आधी कार्यक्रम घेण्यात आल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, २५ जून रोजी सामाजिक न्याय दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्यालाच राजर्षी शाहू महाराज जयंतीचे स्वरूप देण्यात आले. यामागे २७ व २८ जूनच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांसह सलग तीन दिवसांची सुट्टी मिळावी, या उद्देशाने कार्यक्रम मुद्दाम आगाऊ उरकण्यात आल्याची चर्चा प्रशासनात आणि सामाजिक वर्तुळात सुरू आहे.

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

कायदेशीर व प्रशासकीय प्रश्न

शासनाने निश्चित केलेल्या स्मृतिदिन व जयंती कार्यक्रमांच्या तारखांमध्ये स्वतःहून बदल करण्याचा अधिकार कोणत्याही जिल्हा कार्यालयाला नसतो.

शासनाच्या आदेशाचे किंवा विभागीय सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

वरिष्ठांच्या निर्देशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हे शासकीय कर्तव्यातील कसूर मानले जाऊ शकते.

महापुरुषांच्या जयंतीसारख्या अधिकृत शासकीय कार्यक्रमात नियमबाह्य निर्णय घेतल्यास त्याबाबत विभागीय चौकशी करण्याचा अधिकार शासनाला आहे.

या प्रकारामुळे सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या विभागानेच शासनाच्या आदेशाला हरताळ फासल्याची टीका होत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीसारखा अधिकृत कार्यक्रम सोयीसाठी आगाऊ घेणे हे केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाच नव्हे, तर शासनाच्या निर्देशांचा अवमान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाची विभागीय आयुक्त, सामाजिक न्याय आयुक्तालय किंवा शासनस्तरावर सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.

शिंदे गटात प्रवेशापूर्वीच ‘गेम’ झाला? Omraje Nimbalkar यांच्यामुळे भाजपचे बसवराज पाटील विजयी?

Web Title: Dharashiv social justice department celebrates rajarshi shahu maharaj jayanti a day early controversy erupts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Maharashtra Government
  • Rajarshi Shahu Maharaj

संबंधित बातम्या

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
1

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
2

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार
3

ST News : ‘एसटी तेथे एसटी!’ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी लालपरीची खास धाव; 100 मिडी बसेस ताफ्यात दाखल होणार

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी
4

Maharashtra Drought : ‘दुष्काळ जाहीर केला, आता भरीव मदतीचा मुहूर्त कधी?’ हर्षवर्धन सपकाळांची सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.