Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित ‘महाघोटाळ्यात’! तक्रारीनंतरही कारवाई शून्य, आमदार धस मौन का?

धाराशिव जलसंधारण विभागातील ४० कोटींच्या कथित घोटाळ्याने खळबळ. आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतरही कारवाई शून्य! हिवाळी अधिवेशनातही त्यांनी मौन का पाळले? निकृष्ट कामांच्या या महाघोटाळ्याची सविस्तर माहिती वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 16, 2025 | 09:02 PM
धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित 'महाघोटाळ्यात'!

धाराशिव जलसंधारण विभाग ४० कोटींच्या कथित 'महाघोटाळ्यात'!

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • धाराशिव जलसंधारण विभागातील ४० कोटींचा कथित ‘महाघोटाळा’!
  • तक्रारीनंतरही कारवाई ‘शून्य’
  • हिवाळी अधिवेशनातही प्रश्न अनुत्तरित
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी: कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यासाठी जलसंधारणाच्या कामांसाठी शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला. मात्र हा निधी प्रत्यक्ष कामांऐवजी कागदोपत्रीच ‘मुरला’ असून, जिल्हा जलसंधारण विभागात तब्बल ४० कोटी रुपयांचा कथित महाघोटाळा झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे अधिकृत तक्रार केली होती. तथापि, तक्रार होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही चौकशी वा कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे नागपूर येथे नुकतेच पार पडलेले विधानसभेचे हिवाळी अधिवेशन रविवारी संपले असतानाही, या अधिवेशनात आमदार धस यांनी हा प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

१५० कामांसाठी ४० कोटींचा निधी

राज्य शासनाने फेब्रुवारी व मार्च २०२५ मध्ये तीन वेगवेगळ्या शासन निर्णयांद्वारे धाराशिव जिल्ह्यातील जलसंधारण कामांसाठी मोठा निधी मंजूर केला. २० फेब्रुवारी रोजी दोन शासन निर्णयांद्वारे ५२ कामांना, तर ३० मार्च रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ९८ कामांना मंजुरी देण्यात आली. अशा एकूण सुमारे १५० कामांसाठी जवळपास ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. जलसाठ्यांतील गाळ उपसणे, पाझर तलाव व सिमेंट बंधारे दुरुस्ती, नवीन बंधाऱ्यांची उभारणी, खोलीकरण व सरळीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.

कागदोपत्री कामे, कोट्यावधींची उचल?

आमदार धस यांनी केलेल्या तक्रारीनुसार, या कामांपैकी अनेक कामे प्रत्यक्षात न करताच कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून कोट्यावधी रुपयांची उचल करण्यात आली आहे. २० फेब्रुवारीच्या शासन निर्णयांतून ५२ कामांत लाखो घनमीटर गाळ काढल्याचे दाखवून शेतकऱ्यांना अनुदान आणि कंत्राटदार संस्थांना कोट्यावधींची देयके अदा करण्यात आली. याचप्रमाणे ३० मार्चच्या शासन निर्णयानुसार ९८ जलसाठ्यांतील गाळ काढण्याच्या नावाखाली २४ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या सर्व व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे.

हे देखील वाचा: Dharashiv Crime: तारांमध्ये करंट! तरीही ५०० रुपये देवून पुलावर चढवले; विजेच्या धक्क्यात तरुणाचा मृत्यू

ठेकेदारांना आगाऊ देयके, निकृष्ट कामे

तक्रारीनुसार, काही ठेकेदारांना कामे सुरू होण्यापूर्वीच तब्बल ३५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात आली. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याआधीच संपूर्ण देयके अदा करण्यात आली, तर काही कामे अस्तित्वात नसतानाही कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. जलसंधारण विभागाने उभारलेले सिमेंट बंधारे कृषी विभागाने उभारलेल्या बंधाऱ्यांच्या तुलनेत तिप्पट खर्चाचे दाखविण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात या कामांचा दर्जा कृषी विभागाच्या कामांच्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाढीव खर्चातून ३५ ते ४० टक्के रक्कम ठेकेदारांकडून संबंधित अधिकाऱ्यांनी उचलल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

प्रभारी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

या कथित महाघोटाळ्यास प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी जबाबदार असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे. पाझर तलाव दुरुस्ती, सिमेंट नाला बांध दुरुस्ती, गाव तलाव, ओघळ उपचार आदी विविध कामांमध्ये शासनाच्या तसेच जनतेच्या निधीवर हात साफ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची चौकशी कृषी व पाटबंधारे विभागातील अनुभवी व तज्ञ अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र समितीकडून करावी, दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

अधिवेशनात मौन, प्रश्न अनुत्तरित

या गंभीर तक्रारीनंतरही जलसंधारण विभागाकडून किंवा शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे नागपूर येथे पार पडलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उपस्थित केला नाही. नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे आमदार जलसंधारण प्रकरणात अधिवेशनात गप्प का राहिले, असा सवाल नागरिक व सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

हे देखील वाचा: विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

आंदोलनाचा इशारा

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरही शासनाने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट न केल्यास, संबंधित लोकप्रतिनिधी व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी दिला आहे. दुष्काळी धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोट्यावधींचा निधी प्रत्यक्षात शेतकरी व पाणीटंचाईग्रस्त जनतेपर्यंत पोहोचणार की कागदोपत्रीच मुरणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dharashiv water conservation department involved in an alleged mega scam of 40 crore rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 09:02 PM

Topics:  

  • Dharashiv
  • water news

संबंधित बातम्या

Dharashiv Crime: तारांमध्ये करंट! तरीही ५०० रुपये देवून पुलावर चढवले; विजेच्या धक्क्यात तरुणाचा मृत्यू
1

Dharashiv Crime: तारांमध्ये करंट! तरीही ५०० रुपये देवून पुलावर चढवले; विजेच्या धक्क्यात तरुणाचा मृत्यू

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले
2

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

एकनाथ खडसेंच्या अडचणींत होणार वाढ? भोसरी जमीन खरेदीप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
3

एकनाथ खडसेंच्या अडचणींत होणार वाढ? भोसरी जमीन खरेदीप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?
4

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.