Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

धाराशिव जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची माहिती समोर येते. या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 12, 2026 | 02:24 PM
कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट, आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक, दोषींवर कारवाईची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांची लाखोंची आर्थिक लूट
  • आरोग्य विभागात अमानवीय पिळवणूक
  • दोषींवर कारवाईची मागणी
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : आरोग्य विभागासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये बाह्य (आउटसोर्सिंग) यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांची अमानवीय आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतनापेक्षा अत्यल्प रक्कम देऊन उर्वरित रकमेचा अपहार केला जात असल्याचे आरोप होत असून, या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर घोटाळ्यातील अनेक पुरावे दैनिक ‛नवराष्ट्र‘च्या हाती आले आहेत.

नेमका प्रकार काय?

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्ग ३ आणि वर्ग ४चे शेकडो कर्मचारी बाह्य (आउटसोर्सिंग) यंत्रणेमार्फत कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार या कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ६२६ ते ७८३ रुपये इतके किमान वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात संबंधित कर्मचाऱ्यांना फक्त २०० रुपये प्रतिदिन इतके वेतन दिले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. म्हणजेच देय रकमेपैकी सुमारे ६० टक्क्यांहून अधिक रकमेचा अपहार दरमहा होत असल्याचे चित्र आहे.

कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

मासिक वेतनात मोठी तफावत

शासकीय नियम आणि कायद्यानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन साधारणतः १७ ते १८ हजार रुपये असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हातात केवळ ६ हजार रुपये दिले जात आहेत. उर्वरित रक्कम कोणाच्या खिशात जाते? हा प्रश्न लोकांतून विचारला जात असून याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा लाखो रुपयांचा आणि वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार होत असल्याचा आरोप आहे.

कोणाच्या संगनमताने घोटाळा?

सोलापूरस्थित एका आणि अन्य बाह्य यंत्रणेद्वारे जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये कर्मचारी पुरवले जातात. या संपूर्ण व्यवहारात संबंधित खाजगी यंत्रणेसोबतच काही शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे आरोप आहेत. यात जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी जोर धरत आहे.

कर्मचाऱ्यांची बिकट परिस्थिती

अनेक कर्मचारी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि वैद्यकीय खर्च भागवताना त्यांची कसरत सुरू आहे. अपुऱ्या वेतनामुळे काही कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी उघडपणे तक्रार करण्यास धजावत नाहीत. या भीतीचाच गैरफायदा घेत संबंधित यंत्रणेने गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू ठेवला असल्याचे बोलले जात आहे.

कायदेशीर पैलू

कंत्राटी कर्मचाऱ्यांची ही राजरोस आर्थिक पिळवणूक, किमान वेतन कायद्याचे उघड उल्लंघन, करारातील अटींचा भंग आणि आर्थिक अपहार अशा गंभीर गुन्ह्यांच्या चौकटीत हा प्रकार बसतो. यामध्ये दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. दरम्यान, याची संबंधित यंत्रणेने किंवा खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशी करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देत त्यांची या दुष्टचक्रातून सुटका करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मागणी काय?

संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करावी. कर्मचाऱ्यांना थकित रक्कम तत्काळ अदा करावी. दोषींवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी करावी. जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घामाचे पैसे कोणाच्या घशात जात आहेत? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आता अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांवरील अन्याय आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित बाह्य यंत्रणेची बाजू कळावी म्हणून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना संपर्क होऊ शकला नाही.

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

 

Web Title: Millions looted from contract workers in dharashiv district demand for action against offenders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक
1

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना
3

शेतकरी घेणार इस्राईलमध्ये आधुनिक शेतीचे धडे! १० दिवसांचा विशेष अभ्यास दौरा; कृषी अधिकाऱ्यांसह पथक रवाना

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर
4

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.