Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवशी नाळ असलेल्या भूमिपुत्राचा जागतिक सन्मान; डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची IRF इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची International Road Federation (IRF) इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 10, 2026 | 05:26 PM
धाराशिवशी नाळ असलेल्या भूमिपुत्राचा जागतिक सन्मान; डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची IRF इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

धाराशिवशी नाळ असलेल्या भूमिपुत्राचा जागतिक सन्मान; डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची IRF इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवशी नाळ असलेल्या भूमिपुत्राचा जागतिक सन्मान
  • डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची IRF इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड
  • IRF इंडिया चॅप्टरच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रीय अभिमानाची बाब ठरलेल्या घडामोडीत जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय रस्ते मंडळाच्या International Road Federation (IRF) इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व देशात अभिमानाचे वातावरण मराठी मनात निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचे बालपण तत्कालीन धाराशिव जिल्ह्यात व्यतीत झाले आहे.

आधुनिक रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीत उल्लेखनीय कार्य करणारे अभियंता म्हणून डॉ. गायकवाड यांची देशभरात ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झालेला मुंबई ते पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जात असून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज

तसेच बांद्रा ते वरळी सी लिंक, दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, मुंबई मंत्रालयाचे नूतनीकरण, मुंबई उच्च न्यायालयाचे नूतनीकरण आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेले आहेत.

रस्ते विकास, पूल, बोगदे आणि आधुनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत IRF इंडिया चॅप्टरने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इंजि. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पायाभूत सुविधा विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे त्यांचे वडील शिक्षक असताना धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे कार्यरत असताना डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी आपले बालपण तिथे व्यतीत केले आहे. परिणामी त्यांची धाराशिव जिल्ह्याशी खास असे ऋणानुबंध बंध आहेत. आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांना मिळाल्याचे वृत्त जिल्ह्यात प्रसारित होताच धाराशिव जिल्ह्यासह देशभरात मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Dr anilkumar gaikwad elected irf india chapter president news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • india
  • MSRDC

संबंधित बातम्या

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर
1

भारतीय अर्थव्यवस्था World Bank चा विश्वास; नवा अहवाल केला जाहीर, GDP वाढीचा अंदाज थेट 7.1 टक्क्यांवर

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
2

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
3

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?
4

भ्रष्टाचाराचे आरोप अन् अभियंत्याची आत्महत्या; CEC Gyanesh Kumar यांच्याशी संबंधित २००६ च्या प्रकरणाची फाईल पुन्हा का उघडली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.