Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Local Body Election: तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Local Body Election: तुळजापूर नगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (२० नोव्हेंबर) तुळजापूर शहरात जनसमर्थन रॅली काढण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2025 | 03:05 PM
तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • तुळजापूर शहरात जनसमर्थन रॅली
  • तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन
  • राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका
Maharashtra Local Body Election News in Marathi: धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर नगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (२० नोव्हेंबर) तुळजापूर शहरात जनसमर्थन रॅली काढण्यात आली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या शक्तीप्रदर्शनात तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

यावेळी झालेल्या सभेत आमदार राणा पाटील यांनी सांगितले की, विरोधकांकडून खोटेनाटे आरोप केले जात आहेत. भाजपाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुढे येऊन आपल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत. जर कोणाकडे काही आरोप असतील, तर त्याचे ठोस पुरावेही दाखवावेत.

Maharashtra Politics: ‘या’ नगरपरिषदेत बंडखोरांचे काय होणार? यंदा तब्बल 39 अपक्ष रिंगणात

तुळजापूरच्या विकासाचे दावे करणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील कामांची यादी दाखवावी. ज्यांच्या कारभारात तुळजापूरचा विकास ठप्प झाला, तेच आज आमच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. भाजपाच्या नेतृत्वात तुळजापूर शहरात रस्ते, स्वच्छता, जलप्रकल्प, बाजार विकास, पर्यटन सुविधा आणि नागरिक सेवा यांना प्राधान्य देऊन अनेक कामे करण्यात आली आहेत. उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) यांचे सरकार असताना त्यांनी तुळजाभवाणीसाठी एक रुपयाचा तरी निधी आणला का, हे त्यांनी दाखवून द्यावे. असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, विकासाच्या आधारे मतदान करा, अफवा आणि खोट्या प्रचाराला बळी पडू नका. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोर्चा, युवा कार्यकर्ते यांच्यासह सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान भाजप समर्थकांनी घोषणाबाजी करत आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विजयाचा संकल्प व्यक्त केला.

तर दुसरीकडे राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. असे असताना भाजपमध्ये मात्र आरोपींसाठी दारं उघडी केली जात आहेत. गडचिंचले साधू हत्याकांडात आरोपी म्हणून नाव आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता. मात्र विरोधकांच्या आणि राज्यभरातून केल्या जाणाऱ्या टीकेनंतर तो पक्षप्रवेश आता भाजपने रद्द केला आहे. असं असताना दुसरीकडे राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

Nashik Municipal Election : ‘…तर निवडणुकांवर बहिष्कार टाकणार’, रस्त्याचा प्रश्न चिघळला; ग्रामस्थांचे उपोषण

Web Title: Strong show of strength by bjp in tuljapur mla rana patil attacks opponents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Dharashiv Tuljapur
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.