Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Gaikwad : ‘आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा’; माजी खासदार सुनील गायकवाड यांचा बालसंस्कार शिबिरात संदेश

“आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे,” असे प्रतिपादन लातूरचे माजी खासदार आणि संसदरत्न प्रा. डॉ. एडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांनी बीड जिल्ह्यातील देवळा येथे आयोजित बालसंस्कार शिबिरात केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 04:32 PM
'आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा’; माजी खासदार सुनील गायकवाड यांचा बालसंस्कार शिबिरात संदेश

'आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा’; माजी खासदार सुनील गायकवाड यांचा बालसंस्कार शिबिरात संदेश

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : “आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा असून मुलांनी शिक्षणासोबत कृतज्ञता, आदर आणि सेवा करण्याची भावना जोपासली पाहिजे. संस्कारातूनच सुदृढ समाजाची निर्मिती होते,” असे प्रतिपादन लातूरचे माजी खासदार आणि संसदरत्न प्रा. डॉ. एडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांनी केले. बीड जिल्ह्यातील देवळा येथे आयोजित बालसंस्कार शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदलत्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील संस्कार, जिव्हाळा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

बालक, युवक आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. गायकवाड म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात मुलांनी शिक्षणाबरोबरच मानवी मूल्ये आणि कुटुंबप्रती असलेली जबाबदारी समजून घेणे आवश्यक आहे. समाजाच्या सुदृढ जडणघडणीसाठी संस्कार ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Warli Art Design : पुणे SNDT च्या विद्यार्थीनीची कमाल! सई राऊतच्या वारली पेंटिगला भारत सरकारकडून पेटंट

या कार्यक्रमास ह.भ.प. छगन महाराज खडके (प्रती इंदुरीकर), लालासाहेब पवार, राजेसाहेब पवार, प्रा. बालकनाथ यादव तसेच संयोजक अमोल शेळके शास्त्री महाराज यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी डॉ. गायकवाड यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात उपस्थित बालक, युवक आणि ग्रामस्थांनी त्यांच्या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात संस्कार, कुटुंब मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यावर विशेष भर देण्यात आला.

सुनील बळीराम गायकवाड हे महाराष्ट्रातील लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, शिक्षणतज्ज्ञ, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून विजय मिळवत संसदेत प्रवेश केला. ते भारतीय जनता पक्षाशी (भाजप) संबंधित असून ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक प्रश्न आणि वंचित घटकांसाठी काम करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.  तसेच राजकारणासोबतच ते संस्कार, शिक्षण, युवक मार्गदर्शन, सामाजिक जनजागृती आणि ग्रामीण विकास यांसारख्या विषयांवर सक्रियपणे मार्गदर्शन करत असतात. विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे सहभागी होत असतात. विशेषतः आई-वडिलांचा सन्मान, कुटुंबव्यवस्था, नैतिक मूल्ये आणि बालसंस्कार यांसारख्या विषयांवर ते सातत्याने भाष्य करतात.

लातूरसह मराठवाडा भागातील विविध सामाजिक उपक्रम, शिबिरे आणि सार्वजनिक कार्यक्रमांतून त्यांनी जनसंपर्क टिकवून ठेवला असून सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

Mira Bhayandar: ई-फार्मसीच्या वाढत्या विक्रीविरोधात मीरा-भाईंदरमध्ये औषध विक्रेत्यांचे आंदोलन; एक दिवसाचा बंद ठेवून निषेध

Web Title: Sunil gaikwad message on parent service at bal sanskar camp beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Beed News
  • Family

संबंधित बातम्या

Beed Dog Attack CCTV : बीडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद! कुत्र्यांनी चिमुकल्याला फरफटत नेलं
1

Beed Dog Attack CCTV : बीडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद! कुत्र्यांनी चिमुकल्याला फरफटत नेलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.