Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assembly Session 2025: विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का? सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं

या सरकारमध्ये थोडी जरी धमक असती तर त्यांनी पुढाकार घेतला असता. लोणीकर आणि कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला त्यावर पुढे येऊन भूमिका मांडली असती, चूक मान्य केली असती आणि शेतकऱ्यांची माफी मागितली असती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 01, 2025 | 02:39 PM
Assembly Session 2025: विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का?  सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

Assembly Session 2025:  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.  बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या  वक्तव्यांवरून नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले होते. कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा  अशी मागणीही त्यांंनी सभागृहात केली. त्यावरून मोठा गदारोळ झाला आणि विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केले. या सर्व प्रकारावरून माध्यमाशी बोलताना नाना पटोलेंनी पुन्हा एकदा सभागृहात घडलेल्या प्रकारावर निशाणा साधला. मला रोज निलंबित केले तरी चालेल पण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. तसेच सभागृहात घडलेल्या प्रकारावरही भाष्य केलं.

नाना पटोले म्हणाले, “”आज अवकाळी पावसामुळे शेतकरी उदध्वस्त झाला आहे. पिकेच्या पिके नाहीशी झाली आहेत. शेतीचा हंगाम असूनही त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत. शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. तोही दिला नाही. कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले, तेही पूर्ण केले नाही. आता पीकविमाही बंद करून टाकला. पण आम्ही आवाज उठवत राहणार, एक दिवस काय दररोज निलंबित केलं तरी हरकत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी बोलत राहणारच. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, जोपर्यंत लोणीकर आणि कोकाटे यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही.”

Mumbai : शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा होता पण सरकार परवानगी देणार नाही

आज शेतकऱ्यांचा दिवस आहे. त्यानिमित्त मी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. पण केंद्रातील सरकार माजलेलं भाजप महायुतीचं सरकार आहे. या सरकारची वास्तविकतापुढे आली आहे. ते शेतकऱ्यांना भिकारी समजत आहेत.  2014 पूर्वी हा लोणीकर उघडाच फिरत होता. हे आम्ही पाहिलं आहे.  पण जो शेकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं आणि जे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात त्यांना सभागृहात मान द्यायचा. असं हे भाजप सरकार  आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पटोले म्हणाले,  या सरकारमध्ये थोडी जरी धमक असती तर त्यांनी पुढाकार घेतला असता. लोणीकर आणि कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला त्यावर पुढे येऊन भूमिका मांडली असती, चूक मान्य केली असती आणि शेतकऱ्यांची माफी मागितली असती. असंही त्यांनी नमुद केलं.

प्रेमासाठी वाट्टेल ते! Korean मुलाने जिंकले पंजाबी मुलीचे मन, जपली भारतीय परंपरा; लग्नातील वेष पाहून म्हणाल, ‘मुलगा असाच हवा’

निलंबनाच्या संदर्भात विचारलेल्य प्रश्नाव बोलताना नाना पटोले म्हणाले, “मी अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहचलो, मी अध्यक्षांचा अपमान केला, त्यांना धमकावलं अशा पद्धतीने रेकॉर्डवर आणलं. मीही विधानसभा अध्यक्ष राहिलो आहे. नियम मलाही माहिती आहेत.  पण ज्यावेळी अध्यक्षच जनतेचे प्रश्न दाबतो, विरोधकांचा आवाज दाबला जातो,  तिथे विरोधकांना ही भूमिका घ्यावी लागते,हे लोकतंत्र आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सर्टिफीकेटची गरज नाही.”

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “अध्यक्षांपर्यंत पोहचण्याचा हा पहिला प्रकार नाही. नाना पटोले तर  अध्यक्षांपासून खूप लांब  होते. ते एकटेच होते.आताचे सत्ताधारी ज्यावेळी विरोधी पक्षात असताना आम्ही तर आख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली पाहिली आहे. आकसाने  आपल्या अंगावर हे प्रकऱण आपल्यावर येतय असं दिसत असताना  सत्ताधारी प्लॅन करून नानांना बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही. अशा पद्धतीने लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात आहेत. विधानसभेत आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या उद्देशाने नाना पटोलेंनी हे पाऊल उचललं असेल तर आम्ही त्यांचे समर्थन करतो.”

Web Title: Did the speaker of the assembly really get insulted what exactly happened in the house nana patole told everything

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Assembly Monsoon Session 2025
  • Jitendra Awhad
  • Nana patole

संबंधित बातम्या

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली
1

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली

Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट
2

Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
3

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन आणि डोपिंग विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर; जाणून घ्या विधेयकाबाबत संपूर्ण माहिती..
4

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन आणि डोपिंग विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर; जाणून घ्या विधेयकाबाबत संपूर्ण माहिती..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.