प्रेमासाठी वाट्टेल ते! Korean मुलाने जिंकले पंजाबी मुलीचे मन
डिजिटल युगात अनेक नवनवे बदल झाले आहेत. या बदलांमुळे बाहेरील देशातील लोकांसोबत संवाद साधने अतिशय सोपे झाले आहे. हल्ली सोशल मीडियावरील डेटिंग ऍप्स किंवा वेगवेगळ्या वेबसाईटद्वारे ओळख केली जात आहे. सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात होते. असे काहीसे कवलजीत कौरनेही केले. सोशल मीडियावर अमृतसरच्या कवलजीत कौरची एका कोरियन मुलासोबत मैत्री झाली होती. या मुलाचे नाव गँगर्यून असे आहे. त्यांच्या सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीचे स्वरूप हळूहळू प्रेमात बदलले. त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. कवलजीत आणि चो या दोघांनी शीख रितीरिवाजांनुसार लग्न केले. आपल्या प्रेमासाठी कोरियन मुलाने भारतीय शेरवानी घातली होती तर वधू राणी कवलजीतने गुलाबी सूट परिधान केला.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
पंजाबी पोशाखात सजलेल्या नव वधू वराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. लग्नाच्या खास दिवशी चो ने वधूच्या पोशाखाला मॅच होणारी गुलाबी पगडी परिधान केली आहे. 25 मे रोजी दोघांनीही कोरियन लग्न समारंभ आयोजित केला होता.ज्यासाठी त्यांनी कोरियन पद्धतीचा पोशाख परिधान केला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
प्रेमासाठी वाट्टेल ते! Korean मुलाने जिंकले पंजाबी मुलीचे मन
पंजाबी नववधू लग्नात साडी किंवा लेहेंगा परिधान करतात. मात्र या वधूने लग्नात सूट परिधान केला आहे. कवलजीतने लग्नाच्या दिवशी उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी गुलाबी रंगाचा सूट निवडला. नववधूवर गुलाबी रंगाचा सूट अतिशय सुंदर दिसत आहे. यासोबत तिने गुलाबी रंगाच्या सूटवर सुंदर दुपट्टा, दागिना, कानातले घालून लूक अगदी परिपूर्ण बनवला आहे.तिच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे.
लग्नाच्या दिवशी कवलजीतने गुलाबी रंगाची कुर्ती घातली आहे, ज्याची नेकलाईन गोल आहे. तसेच तिने परिधान केलेल्या कुर्त्याची लांबी तिच्या गुडघ्यापर्यंत आहे. गुलाबी कुर्तीवर सोनेरी रंगाच्या धाग्यांचे विणकाम आणि नक्षीकाम केलेले आहे. तसेच लग्नाच्या दिवशी परिधान करण्याचा कुर्ता आणखीनच आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी सिक्वेन्स आणि मण्यांचे काम करण्यात आले आहे.
लग्नाआधी नववधूच्या हातांवर मेहंदी का काढली जाते? जाणून घ्या यामागील सुंदर कारण
प्रेमासाठी वाट्टेल ते! Korean मुलाने जिंकले पंजाबी मुलीचे मन
कोरियन मुलांना लग्नात आयव्हरी शेड शेरवानी घातली आहे. या शेरवानीचा लुक आणखीनच उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी त्यावर त्याने गुलाबी रंगाची पगडी परिधान केली आहे. शेरवानीच्या गळ्यावर भरीव नक्षीकाम करण्यात आले आहे.तसेच गुलाबी दुपट्टा, जुट्टी आणि गुलाबी पगडी घालून चो लग्नासाठी तयार झाला आहे.कवलजीत आणि चो यांनी शीख विवाहसोबतच कोरियन पद्धतीने सुद्धा विवाह केला.