शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना स्पष्ट केलं की, “फडणवीसांनी GR काढला म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला नाही.” शिवसेना ही जनतेच्या हक्कासाठी जन्मलेली चळवळ आहे, असं ते म्हणाले. शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा आमचा मानस होता, पण सरकार परवानगी देणार नाही, असंही राऊतांनी सांगितलं. तसेच राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, “तो त्यांचा विषय आहे,” असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया टाळली.