Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News : यमाई तलावालगतची जमीन हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जमीन मंदिर समितीकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी तात्काळ शासनास प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2026 | 03:05 PM
Pandharpur News : यमाई तलावालगतची जमीन हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Pandharpur News : यमाई तलावालगतची जमीन हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर शहरातील गट क्रमांक 161 मधील यमाई तलावालगत सुमारे 3 हेक्टर 12 आर क्षेत्रफळाची जागा आहे. ही जागा शासन मालकीच्या जमिनीचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांना हस्तांतरण करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीदरम्यान, सदर जमीन मंदिर समितीकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी तात्काळ शासनास प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. सदर जागा मंदिर समितीस प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी पर्यटन (सहल) केंद्र तसेच गोमाता जतन व संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे. बैठकीस ऑनलाईन पद्धतीने मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, मंदिर समिती सदस्य भास्करगिरी महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच प्रत्यक्ष मंदिर समिती सदस्या ॲड. माधवी निगडे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत, या जागेवर मंदिर समितीची गोशाळा कार्यरत असून, सुमारे 250 लहान-मोठी गाई व वासरे येथे आहेत. या गाईंमधून मिळणाऱ्या दुधाचा उपयोग श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्योपचारासाठी केला जातो. प्रस्तावित प्रकल्पासाठी मंदिर समितीने प्रारूप आराखडा तयार केला असून सदर काम मंदिर समितीच्या निधीतून करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Hanuman Temple : भारतातील ‘अशी’ 5 हनुमान मंदिरं जिथे आजही घडतात चमत्कार, काय आहे यामागचं गूढ

पुरंदरमध्ये भूसंपादन प्रक्रियेला गती

दुसरीकडे, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळण्याची शक्यता असून पुढील दोन ते तीन दिवसांत अधिकृत मान्यतापत्र मिळेल, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. मान्यतापत्र आल्यानंतर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन नुकसान भरपाईचा अंतिम दर निश्चित केला जाणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंदाजे १५ दिवसांत प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होईल.

Web Title: Directives issued to district collector to immediately submit proposal regarding land transfer adjacent to yamai lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Government Decision
  • maharashtra news
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

पुण्यात पहिल्याच दिवशी 8 हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना
1

पुण्यात पहिल्याच दिवशी 8 हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना

मोठी बातमी ! तब्बल 45988 नावे रेशन कार्डवरून वगळली; राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम सुरु
2

मोठी बातमी ! तब्बल 45988 नावे रेशन कार्डवरून वगळली; राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम सुरु

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा
3

धक्कादायक ! तीन महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांची आत्महत्या; काँग्रेसने साधला सरकारवर निशाणा

राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी
4

राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.