फोटो सौजन्य : गुगल
संगम तटावरील निद्रा अवस्थेतील हनुमान, प्रयागराज
प्रयागराजमधील पवित्र संगम नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. येथील हनुमानाची मूर्ती उभ्या किंवा बसलेल्या अवस्थेत नसून, निद्रावस्थेत आहे.धार्मिक मान्यतेनुसार, दरवर्षी जेव्हा गंगेच्या पाण्याची पातळी वाढते, तेव्हा स्वतः गंगा माता भगवान हनुमानाच्या चरणांना स्पर्श करायला येते. स्नान करून संगमाला भेट देणे आवश्यक मानले जाते, कारण ही एकमेव संपूर्ण तीर्थयात्रा आहे.
महावीर मंदिर, पाटणा
पाटणा जंक्शनजवळ असलेले महावीर मंदिर हे उत्तर भारतातील सर्वात पूजनीय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, ते आपल्या सामाजिक कार्यासाठीही ओळखले जाते.येथे हनुमानाच्या दोन मूर्ती स्थापित आहेत, त्यापैकी एक मूर्ती वाईटाचा नाश करणारी आणि दुसरीला भक्तांचे दुःख दूर करणारी आहे अशी या ठिकाणची मान्यता आहे.असं म्हटलं जातं की येथे भक्तीभावाने केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि कोणताही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही.
गिरिजाबंध हनुमान मंदिर, विलासपूर
विलासपूरजवळ असलेले गिरिजाबंध हनुमान मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे. जिथे हनुमान चक्क स्त्रीवेषात असून त्याची पूजा केली जाते. या ठिकाणी स्थापित केलेली दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती अत्यंत प्राचीन आहे. असा विश्वास आहे की, जे भक्त खऱ्या मनाने हनुमानाचे दर्शन घेतात आणि त्याची पूजा करतात, त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुख आणि समृद्धी प्राप्त होते असा बजरंगबलीकडू आशीर्वाद मिळतो.
बालहनुमान मंदिर, दिल्ली
दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये असलेले हे मंदिर इतिहास आणि अध्यात्म याचं समीकरण आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचं म्हटले जातं. या ठिकाणी भगवान हनुमानाची बालरूपातील मूर्ती विराजमान आहे. भक्त येथे कुंकू आणि अत्तर अर्पण करतात. असं म्हटलं जातं की, या बालहनुमानाचं दर्शन घेतल्याने सर्व अडथळे दूर होतात असा विश्वास आहे.
हनुमानगढी, अयोध्या
हनुमानगढीला वंदन केल्याशिवाय अयोध्येची यात्रा अपूर्ण मानली जाते. हनुमानाला अयोध्येचा रक्षक किंवा कोतवाल म्हणून ओळखले जाते. परंपरेनुसार, श्री रामाचं दर्शन घेण्यापूर्वी भाविक हनुमंगढी येथे दर्शनाला येतात. एका उंच टेकडीवर वसलेल्या या मंदिरात पोहोचण्यासाठी भक्तांना पायऱ्या चढाव्या लागतात. येथे मारुती आजही आपल्या बालरूपात प्रकट होतात, असा भाविकांना विश्वास आहे.
Vastu Tips : संध्याकाळी चुकूनही घरात आणू नका ‘हे’ सामान, अत्यंत अशुभ आणि व्हाल कंगाल






