Disabled brothers hold sit-in protest at ZP headquarters in Solapur News Update
सोलापूर : सोलापूर झेडपी मुख्यालयामध्ये दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. झेडपी मुख्यालयामध्ये त्यांनी बसून ठिय्या आंदोलन केले. ग्राम पंचायातीने बांधलेल्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये ५% विना लिलावाने व्यवसायासाठी देण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. यासह दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेनी झेडपी मुख्यालयात ठिय्या मांडला आहे.
सोमवारी (दि.21) सकाळी जिल्हा परिषद येथील पुनम गेट येथे आंदोलनास सुरुवात केली. आंदोलन स्थळी अधिकारी येत नसल्याने दिव्यांगानी आंदोलनाचा मोर्चा थेट सीईओ यांच्या दालनाकडे वळविला. मुख्यालय प्रवेशद्वारात ठिय्या मांडून सीईओ कुलदिप जंगम यांच्यासमोर व्यथा आणि मागण्या मांडल्या. संजय गांधी निराधर विधवा योजना मंजूर झालेल्या महिलांना, महिला बालकल्याण विभाग उत्तर सोलापूर पंचायात समितीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत नसल्याबाबतचे पत्र देण्यात येत नाही. बीडीओ मनमानी कारभार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
घरकुल,सुलभ शौचालय अशा विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा संजिवनी बारंगुळे, सविता डोंगरे, जयकुमार जाधव, विजयकुमार भागवत यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगाच्या ठिय्या आंदोलनाला अखेर सीईओ कुलदिप जंगम यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. सीईओ कुलदिप जंगम यांनी आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सासवड पोलिसांनी धडक कारवाई करत हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त
पुरंदर तालुक्यात बेकायदेशीर धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस फोफावत चालले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सासवड पोलिसांनी धडक कारवाईचे सत्र सुरु केले आहे. हॉटेलमधील बेकायदेशीर दारू विक्री, रस्त्यावरील मुलींची छेडछाड, हॉटेलमधील सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करताना पोलीस अक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत. दरम्यान पुरंदरच्या पश्चिम भागातील भिवरी येथील एका हॉटेलवर कारवाई करून तिथे सुरु असलेला हुक्का पार्लरचा अड्डा उध्वस्त केला आहे. सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय चिले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून स्वप्नील संभाजी ढवळे वय २६, पारस शाही वय २३ आणि इडिन रावल वय २३. सर्व जण रा.भिवरी ता.पुरंदर. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भिवरी येथील हॉटेल सिंडीकेटमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि १९ रोजी रात्रीच्या वेळी तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे यांच्यासह पोलीस हवालदार सुरज नांगरे, पोलीस कॉन्स्टेबल पी आर मखरे, एस.व्ही.गाडेकर यांच्या पथकाने हॉटेल वर छापा मारला.