Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन

सुप्रिया सुळेंविरोधात अपशब्दांचा वापर करून अब्दुल सत्तार यांनी खालचा स्तर जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे, तसेच भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे, याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. अशा मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवेदन आम्ही राज्यपालांना दिले आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 08, 2022 | 03:18 PM
अब्दुल सत्तारांना बडतर्फ करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
Follow Us
Follow Us:

मुंबई – अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आक्रमक झाला असून आज अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून (Cabinet) बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना दिले.

सुप्रिया सुळेंविरोधात अपशब्दांचा वापर करून अब्दुल सत्तार यांनी खालचा स्तर जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे, तसेच भारताच्या संसदेच्या सदस्य असेलल्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे, याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहे. अशा मंत्र्याला बडतर्फ करण्याची मागणी करणारे निवेदन आम्ही राज्यपालांना दिले आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

ही पहिली घटना नाही. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाऐवजी दारु पिता का? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. अनेकवेळा त्यांनी अशा प्रकारे विधाने केली आहेत. मंत्रिमंडळातील सदस्यांनी काही मर्यादा सांभाळाव्या लागतात. मात्र, त्याचे वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी राज्यापालांकडे केली आह, असे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब याबाबतीत निर्णय घेतला पाहिजे. राज्यात अशा प्रकारे भाषा वापरण्याची पद्धत नाही. राज्याची एक राजकीय संस्कृती आहे. आपण कितीही एकमेकांचे विरोधक असलो, तरीही भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळली. आपण कोणाचा अरे-तुरे असा एकेरी उल्लेखही करत नाही, अशा परंपरेला छेद देण्याचे काम सत्तार यांनी केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Dismiss abdul sattar ncps statement to governor nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2022 | 03:18 PM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Governor Bhagat Singh Koshyari
  • Nationalist Congress Party
  • supriya sule

संबंधित बातम्या

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक
1

Supriya Sule : ‘मंत्र्यांच्या गाड्या अडवा, जेलमध्ये जायची माझी तयारी’ पंढरपुरात दुष्काळाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.