सोलापूर : जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून अशोक चौक सोमपा भावनाऋषी हॉस्पिटल जवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या उपस्थितीत विधवा, गोरगरीब, गरजू २१ महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. माझ्या गोरगरीब महिलांचा आशिर्वादच माझ्यासाठी देवीचा आशीर्वाद आणि गोरगरीब, कष्टकरी महिला भगिनींच्या आशीर्वादामुळे तीनदा निवडून आले. माझ्या निवडून येण्याचा फायदा गरजू महिलांना झाले पाहिजे, म्हणून त्यांना अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विधवा, गोरगरीब गरजू महिला स्वताच्या पायावर उभे रहावे म्हणून आपण शिलाई मशीनचे वाटप करत आहोत.
[read_also content=”मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्युप्लिकेट’ची न्यायालयात याचिका; गुन्हा रद्द करण्याची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/chief-ministers-duplicate-plea-in-court-demand-for-quashing-of-offence-nrdm-331699.html”]
सुरेश हसापुरे म्हणाले की, आता अनेक महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. तुमच्या वाईट परिस्थितीत आमदार प्रणिती शिंदे धावून येतात. त्यांच्या कार्यालयात सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सर्वसामान्य नागरिकांची भेट घेऊन अडचणी जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करतात, असे आमदार तुम्हाला लाभले आहेत. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.