Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नांदेडमध्ये पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे दिले ‘हे’ निर्देश

नांदेड शहरात पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. समाजमाध्यमांवर फिरणारे मेसेज हे पूर्णपणे अफवा आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 05:13 PM
District Collector Clarifies There Is No Petrol Shortage in Nanded Petrol Pump News

District Collector Clarifies There Is No Petrol Shortage in Nanded Petrol Pump News

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : समाजमाध्यमांवर पेट्रोल-डिझेल तुटवड्‌याच्या अफवा वेगाने पसरत असताना जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीस बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, नांदेड शहरात (Nanded News) पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. समाजमाध्यमांवर फिरणारे मेसेज हे पूर्णपणे अफवा आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये मग पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) गदीं का वाढतेय? याबाबतही प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

जे ग्राहक नेहमी मर्यादित प्रमाणात इंधन घेतात, ते सध्या टॅंक फुल करून घेत आहेत. या प्रकाराला ‘पॅनिक पर्चेस’ असे म्हटले जाते. त्यामुळे अचानक मागणी वाढून पंपांवर गर्दी होत आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांची मर्यादित्त क्षमता आणि – व्यवस्थापनावर ताण येत असल्याने काही ठिकाणी तात्पुरते पंप बंद ठेवावे लागत आहेत. पॅनिक खरेदीमुळे टॅंकर येईपर्यंत साठा संपण्याची परिस्थिती निर्माण होते.

हे देखील वाचा : अखेर उपोषणाला मिळाली स्थगिती; ठेकेदारांची थकबाकी मिळणाण्याबाबत महेंद्र थोरवे यांचं आश्वासन

दुचाकीला मिळणार २०० ते ३०० रुपयांचे पेट्रोल

दरम्यान, इंधन पुरवठा प्रणालीतही काही बदल झाले आहेत. पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी अॅडव्हान्स पेमेंट प्रणाली लागू केली आहे. पूर्वी टैंकर मागवल्यानंतर चार दिवसांत पेमेंट केले जात होते, मात्र आता आगाऊ पेमेंट केल्यानंतरच टैंकर रवाना होतो. त्यामुळे पुरवठ्यात थोडा विलंब होत आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पॅनिक खरेदी टाळण्यासाठी दुचाकी वाहनांना (विना गिअर) २०० रुपये, गिअरसाठी ३०० रुपये, तीनचाकी वाहनांना ५०० रुपये चारचाकी वाहनांना जास्तीतजास्त १५०० रुपये तर मोठ्या जड वाहनांना ५० आणि १०० लिटरपर्यंत इंधन उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : झिरवळांना यावेळीही माफी की राजीनामा? CM फडणवीसांनी पहिल्यांदाच दिली आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया

कॅन, बाटल्या किंवा इतर अनधिकृत कंटेनरमध्ये विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि विक्री नोंदी नियमित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता संयम्म राखा आणि प्रशासनाला सहकार्य करा आपण सर्व जण मिळून परिस्थिती नियंत्रणात ठेवूया. असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले आहे.

Web Title: District collector clarifies there is no petrol shortage in nanded petrol pump news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Nanded
  • nanded news
  • petrol pump

संबंधित बातम्या

Maharashtra News : गोरगरिब धान्यापासून वंचित; मार्च संपत आला तरी रेशनदुकानांमध्ये धान्याचा पुरवठा नाही
1

Maharashtra News : गोरगरिब धान्यापासून वंचित; मार्च संपत आला तरी रेशनदुकानांमध्ये धान्याचा पुरवठा नाही

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral
2

Petrol Pump Viral Video : पेट्रोलसाठी उडाली झुंबड! डब्बे-ड्रम घेऊन पंपावर लोकांची तुफान गर्दी, Video Viral

Maharashtra Politics : परभणीमध्ये महायुतीत नाराजीनाट्य; भाजपने डावलल्याने शिंदे शिवसेना गटाची नाराजी
3

Maharashtra Politics : परभणीमध्ये महायुतीत नाराजीनाट्य; भाजपने डावलल्याने शिंदे शिवसेना गटाची नाराजी

Satara Petrol Shortage Rumors: साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा! पंपांवर वाहनधारकांच्या रांगा; पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण
4

Satara Petrol Shortage Rumors: साताऱ्यात पेट्रोल टंचाईची अफवा! पंपांवर वाहनधारकांच्या रांगा; पुरवठा विभागाकडून स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.