Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निष्क्रिय खासदार विनायक राऊतला पुन्हा निवडून देऊ नका – माजी खासदार निलेश राणे

अंगावर आल्यावर देखील सोडत नाही. चिपळूण तालुक्याने आपल्याला खरी ओळख करून दिली, असे निलेश राणे यांनी यावेळी नमूद केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 15, 2024 | 06:15 PM
निष्क्रिय खासदार विनायक राऊतला पुन्हा निवडून देऊ नका – माजी खासदार निलेश राणे
Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : सध्याच्या खासदाराने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही. या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका. तर मोदींच्या ४०० पारच्या खासदारांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील आपला हक्काचा महायुतीचा खासदार देशाच्या संसदेत पाठवूया, असे आवाहन माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी पेढांबे येथील महायुतीच्या मेळाव्यात करतांना ‘जनतेचे पाणी पळवणारा खासदार’ अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली.

यावेळी विनायक राऊत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जनतेने सन २००९ च्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून दिले. अवघ्या २८ व्या वर्षी देशाच्या संसदेच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी मिळाली. सत्तेत असताना देखील जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. असुर्डे येथे रेल्वे स्टेशन व्हावे, यासाठी सुमारे तीन तास राजधानी एक्सप्रेस रोखून धरली. चिपळूणमधील हातपाटी वाळू व्यवसायिकांच्या प्रश्नासाठी उपोषण आंदोलने केली. यामुळे चिपळूणमधील जनता आपल्यावर टोकाचे प्रेम करते. आपण सहसा कोणावर टीका करत नाही. मात्र, अंगावर आल्यावर देखील सोडत नाही. चिपळूण तालुक्याने आपल्याला खरी ओळख करून दिली, असे निलेश राणे यांनी यावेळी नमूद केले.

खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना हा खासदार महापुरात देखील फिरला नाही. नदीतील गाळ काढण्यासाठी कोणतेही योगदान नाही. तर उलट नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनी गाळ काढण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. कोयना अवजलाचा प्रश्न सोडवू शकला नाही. गेल्या दहा वर्षात या लोकसभा मतदारसंघाला विकासात्मक दृष्टीने मागे नेण्याचे काम केले. नेहमीच नकारात्मक भूमिका ठेवली. इथे कोणतेही उद्योग आणले नाहीत. तर उलट येणाऱ्या उद्योगांना नेहमीच विरोध केला. इथल्या तरुणांच्या हाताला काम दिले नाही. कोकण रेल्वेचे डबल ट्रॅक नाही. महिला बचत गटांना आर्थिकदृष्टीने सक्षम करण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत, मग हा खासदार पुन्हा कशासाठी पाहिजे, असा सवाल निलेश राणे यांनी सवाल उपस्थित करीत आपल्या हक्काच्या महायुतीच्या खासदाराला निवडून देण्याचे आवाहन शेवटी निलेश राणे यांनी यावेळी केले.

या खासदाराला आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही देणंघेणं नाही, अशा या निष्क्रिय खासदाराला पुन्हा निवडून देऊ नका. लांजा येथील जलजीवन मिशन योजनेतील गैरकारभाराची माहिती देताना या खासदाराने जनतेचे पाणी पळवले आहे, या शब्दात राऊत यांच्यावर टीका केली. या मेळाव्याप्रसंगी माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजपा चिपळूण तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रमोद अधटराव आदींनी मनोगते व्यक्त केली. या मेळाव्याचे सूत्रसंचालन भाजपा उतरत्नागिरी जिल्हा सरचिटणीस रामदास राणे यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या मेळाव्याला महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Do not re elect inactive mp vinayak raut former mp nilesh rane maharashtra political party maharashtra government ratnagiri sindhudurg lok sabha constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • Former MP Nilesh Rane
  • LOKSABHA ELECTION
  • MP Vinayak Raut
  • Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असणार? फडणवीसांनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “2029 मध्ये…”
1

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असणार? फडणवीसांनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “2029 मध्ये…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.