Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : तपासावर न्यायालयीन देखरेखीची आवश्यकता नाही, उच्च न्यायालयाकडून दाभोलकर कुटुंबीयांची मागणी फेटाळली

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या तपासाबाबत वारंवार असमाधान व्यक्त करून दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलीस यंत्रणा योग्य तपास करत नसल्याचा आरोप करून तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी कुटुंबीयांनी याचिकेतून केली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 18, 2023 | 10:54 PM
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : तपासावर न्यायालयीन देखरेखीची आवश्यकता नाही, उच्च न्यायालयाकडून दाभोलकर कुटुंबीयांची मागणी फेटाळली
Follow Us
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Founder and Chairman of Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti Dr Narendra Dabholkar) यांच्या हत्येचा तपासावर (Murder Investigation) आणि खटल्यावर न्यायालयीन देखरेख कायम ठेवायची आवश्यकता नाही (There is no need to maintain judicial supervision over the case), असे निरीक्षण उच्च न्यायालयाने (High Court) मंगळवारी नोंदवले आणि देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी फेटाळून लावली (The Dabholkar family’s demand to maintain supervision was rejected).

काय होती याचिका

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या तपासाबाबत वारंवार असमाधान व्यक्त करून दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलीस यंत्रणा योग्य तपास करत नसल्याचा आरोप करून तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी कुटुंबीयांनी याचिकेतून केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

[read_also content=”७०० कोटी फसवणूक प्रकरण : नरेश गोयल यांना परदेश प्रवास नाहीच; मात्र पत्नीला परवानगी, संथ तपासावरून उच्च न्यायालयाची नाराजी, ओढले ताशेरे https://www.navarashtra.com/maharashtra/700-crore-fraud-case-naresh-goyal-does-not-travel-abroad-however-permission-to-the-wife-the-high-courts-displeasure-over-the-slow-investigation-nrvb-387139.html”]

मात्र, या प्रकरणी खटला सुरू झाल्यामुळे प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्याची आणि याचिका प्रलंबित ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा दावा करणारी याचिका आरोपी विक्रम भावे आणि वीरेंद्र तावडे यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर तपासवरील देखरेख कायम ठेवायची की नाही याचा निर्णय घ्यावाच लागेल. अन्यथा हे कधीच संपणार नाही, असे न्यायालयाने १ एप्रिल रोजी निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले होते. त्यानुसार, न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने मंगळवारी निर्णय जाहीर केला.

न्यायालयाचे निरिक्षण

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करता दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून सीबीआयने अहवालही दिल्लीतील मुख्यालयाकडे पाठवला आहे. खटल्यातील ३३ पैकी १८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून काहीची साक्ष नोंदवणे शिल्लक आहे. अन्य साक्षीदारांची साक्ष नोंदवणार नसल्याचे सीबीआयनेही स्पष्ट केले आहे. या सगळ्या स्थितीचा विचार करता या प्रकरणावर उच्च न्यायालायने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नाही, असेही खंडपीठाने आठ पानी आदेशात नमूद केले.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित या खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झआल्यानंतर न्यायालयीन देखरेख संपुष्टात येते. त्यानंतर खटला चालवणाऱ्या न्यायालय आवश्यक त्या बाबींची काळजी घेणे अपेक्षित आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला याचिका निकाली काढताना खंडपीठाने आदेशात नमूद केला आहे.

[read_also content=”उच्च न्यायालयाकडून अल्पवयीन आरोपीला अंतरीम जामीन, पोक्सोंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल करणे अयोग्य; न्यायालयाने नोंदवले निरीक्षण https://www.navarashtra.com/maharashtra/interim-bail-to-juvenile-accused-by-high-court-improper-filing-of-chargesheet-under-pocso-observations-reported-by-the-court-nrvb-387137.html”]

याचिकाकर्त्यांचा सुनावणीदरम्यान दावा

प्रकरणावर न्यायालयाने देखरेख का ठेवावी? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. तेव्हा, समाजातील बुद्धिजीवींची आणि विचारवंताची त्यांच्या विचारधारांमुळे हत्या करण्यात आली आहे. दाभोलकर प्रकरणातील मुख्य “मुख्य सुत्रधार” पकडला जाणे आवश्यक आहे. तसेच कॉ. गोविंद पानसरे, कन्नड लेखक एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या आणि नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी सारखेच आहेत. वैचारिक मतभेदांमुळे या सर्वांची हत्या झाली आहे.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 18 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-18-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

एखाद्याची विचारधारा आवडली नाही म्हणून त्यांचा काटा काढण्यात आला आहे. दाभोलकर अंधश्रद्धेच्या विरोधात होते, पानसरे यांनी शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिले होते, कलबुर्गी यांनी लिंगायतांना हिंदूंपासून वेगळे करण्याचा प्रचार केला होता आणि लंकेश यांची परखड मत काहींच्या पचनी पडत नव्हती. त्यामुळे या प्रकऱणातील मुख्य सूत्रधार शोधणे आवश्यक असून त्यासाठी उच्च न्यायालयाने किमान पुढील ६ महिने प्रकरणावर देखरेख ठेवावी, असे आवाहन दाभोलकर कुटुंबियांनी केले होते.

Web Title: Dr narendra dabholkar murder case update no need for judicial review of probe high court rejects dabholkar family plea nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2023 | 10:54 PM

Topics:  

  • High court
  • rejects

संबंधित बातम्या

Visa Rejection: आयर्लंड दूतावासांनी ३,३०० भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा फेटाळले,पण का? जाणून घ्या
1

Visa Rejection: आयर्लंड दूतावासांनी ३,३०० भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा फेटाळले,पण का? जाणून घ्या

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
2

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?
3

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.