Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 24 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought: भेगाळलेली जमीन अन् उपाशी जनावरे! डॉ. नीलम गोऱ्हेंनी दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Drought: मराठवाडा दौऱ्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी उदगीर तालुक्यातील करडखेल आणि दिग्रज येथील शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 09, 2026 | 06:34 PM
Maharashtra Drought 2026

Maharashtra Drought 2026

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त भागात पाहणी झाली नसल्याने नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला खेद
  • ता. उदगीर जि. लातूर येथे थेट बांधावर जाऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दुष्काळाची पाहणी
  • गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच चारा उपलब्ध करण्याचे निर्देश 
उदगीर/Dr. Neelam Gorhe:  चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असतानाही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

मराठवाडा दौऱ्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी उदगीर तालुक्यातील करडखेल आणि दिग्रज येथील शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नांचा आढावा घेतला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कैलास माने यांच्या शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोळ, सरपंच पांडुरंग ढगे, शेतकरी बापुराव माने, श्रीकांत कोंबले, विकास सोसायटीचे चेअरमन कुमार पाटील, बालाजी पडोळे, रोगनाथ गंगाराम ढगे आदी उपस्थित होते.

Maharashtra Drought : दुष्काळाच्या मुद्द्यावर फडणवीस दिल्लीत; अमित शहांसोबतच्या भेटीत काय ठरलं?

शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करा

शासनाने निर्णय घेतल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शेतकरी चारा उपलब्ध नसल्याची व्यथा सातत्याने मांडत असताना प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून जनावरांची संख्या आणि चाऱ्याच्या गरजेची माहिती यापूर्वीच संकलित करायला हवी होती, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तलाठी, सरपंच आणि संबंधित यंत्रणांनी जनावरांची व त्यांच्या मालकांची यादी तातडीने तयार करून खातरजमा करावी. त्या आधारे चारा पुरवठ्याचे नियोजन करून सोमवारपर्यंत गावात चारा पोहोचवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामस्थांनी सुमारे दोन हजार जनावरांसाठी चाऱ्याची गरज मांडली असून, याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी व शेतमजुरांना भरीव मदत द्या : सुधाकर भालेराव

माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. विहिरी व बोअरवेलचे पाणी आटत असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी, वीजबिलात दिलासा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी भालेराव यांनी केली. भूमिहीन शेतमजुरांसाठीही आर्थिक सहाय्य व रोजगाराची व्यवस्था करावी. प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदतीला विलंब होऊ न देता तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पाणी, रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवरही पाठपुरावा

पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक टँकरची व्यवस्था, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती आणि शासन निर्णयातील सवलतींच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. रोजगार हमीअंतर्गत कामे सुरू करून शेतमजुरांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि स्थलांतर टाळता यावे, यावर त्यांनी भर दिला. पाणीपुरवठ्याच्या पात्र कामांसाठी आमदार निधीतून ₹२५ लाखांपर्यंत मदत करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी मिळू शकते का, याची तपासणी करून शासनाकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक संस्था व सीएसआर निधीच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य व पोषणाच्या गरजांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. “दुष्काळाचा प्रश्न राजकारणापलीकडचा आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे,” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

Web Title: Dr neelam gorhe instructed officers to measures to maharashtra drought 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Rohit Pawar : सरकारला आता थेट नागपुरात घेरणार! रोहित पवार काढणार ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी केल्या ६ मोठ्या मागण्या
1

Rohit Pawar : सरकारला आता थेट नागपुरात घेरणार! रोहित पवार काढणार ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी केल्या ६ मोठ्या मागण्या

Buldhana: दुष्काळात गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशासकीय अन् आर्थिक अधिकार द्या; आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2

Buldhana: दुष्काळात गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशासकीय अन् आर्थिक अधिकार द्या; आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ
3

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
4

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.