Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: दुष्काळात गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशासकीय अन् आर्थिक अधिकार द्या; आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shweta Mahale letter to Devendra Fadnavis on Sarpanch Powers: दुष्काळी परिस्थितीत गावातील विकासकामे आणि मूलभूत सुविधा रखडू नयेत, यासाठी सरपंच प्रशासकांना प्रशासकीय व आर्थिक अधिकार देण्याची मागणी आ. श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 09:58 PM
Shweta Mahale letter to Devendra Fadnavis

Shweta Mahale letter to Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या गावाची विकासकामे रखडली
  • सुरळीत कारभारासाठी सरपंचांना अधिकार देण्याची मागणी
  • आमदार श्वेता महालेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
चिखली: दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकासकामे आणि नागरिकांच्या मुलभूत सुविधांची कामे रखडू नयेत, यासाठी ग्रामपंचायतींचा कारभार पाहणाऱ्या सरपंच प्रशासकांना आवश्यक प्रशासकीय व आर्थिक अधिकार प्रदान करावेत, अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार सरपंच प्रशासक म्हणून ग्रामपंचायतींचा कारभार पाहत आहेत. (Buldhana)

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

मात्र, प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांना आवश्यक प्रशासकीय, आर्थिक आणि विकासकामांबाबत निर्णय घेण्याचे पुरेसे अधिकार नसल्यामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी, गावातील विकासकामे तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची कामे प्रभावित होत असल्याचे आ. महाले यांनी पत्रात नमूद केले. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारे, पथदिवे, आरोग्य, बांधकामे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते.

या कामांची जबाबदारी सरपंच प्रशासकांवर असताना आवश्यक अधिकारांच्या अभावामुळे विकासकामांना विलंब होत असून, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सरपंच प्रशासकांवर गावाच्या विकासाची आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची मोठी जबाबदारी असते.

ग्रामपंचायतीचा कारभार प्रभावीपणे चालविण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे राज्यातील सर्व सरपंच प्रशासकांना ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीतपणे व सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय, आर्थिक व विकासकामांसंबंधीचे अधिकार देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती महाले यांनी केली.

मजुरी व खर्च करण्याचे अधिकार देण्याची गरज

या पार्श्वभूमीवर आ. श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार, मंजूर निधीतून आवश्यक विकासकामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता व खर्चाचे अधिकार, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, गटारे व पथदिवे यासारख्या मुलभूत सुविधांची तातडीची कामे करण्याचे अधिकार, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व ग्रामपंचायत आणि आवश्यकतेनुसार नियमित सरपंचांप्रमाणे मजुरी व खर्च करण्याचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली.

Mumbai News : ‘META भाजपाचा बेटा’ म्हणत मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक, BKC कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आमदार श्वेता महाले यांनी कोणती मागणी केली?

    Ans: सरपंच प्रशासकांना प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार देण्याची मागणी केली आहे.

  • Que: श्वेता महाले यांनी कोणाकडे मागणी केली आहे?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

  • Que: सरपंच प्रशासकांना अधिकार देण्याची गरज का आहे?

    Ans: गावातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांची कामे रखडू नयेत म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Shweta mahale demand sarpanch administrative financial powers letter to devendra fadnavis pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • Buldhana
  • gram panchayat
  • Maharashtra Drought 2026
  • MLA

संबंधित बातम्या

बुलढाण्यात जनगणना २०२७ साठी प्रशासन सज्ज; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण सुरू
1

बुलढाण्यात जनगणना २०२७ साठी प्रशासन सज्ज; अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण सुरू

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ
2

Sairat well dried up : संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचं याड लावणारी विहीर आटली; ‘सैराट’मधील प्रसिद्ध विहिरीने गाठला तळ

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती
3

Maharashtra drought 2026: दुष्काळी परिस्थितीचा राज्यपालांकडून आढावा; बलसूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

Drought News : राज्यातील आणखी ६ तालुके दुष्काळी घोषित! एकूण संख्या ३१० वर; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
4

Drought News : राज्यातील आणखी ६ तालुके दुष्काळी घोषित! एकूण संख्या ३१० वर; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.