Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : सरकारला आता थेट नागपुरात घेरणार! रोहित पवार काढणार ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी केल्या ६ मोठ्या मागण्या

Rohit Pawar : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ४ ते ९ डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर असा न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली.

  • By विवेक
Updated On: Nov 22, 2026 | 10:00 PM
Rohit Pawar

Rohit Pawar

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळावरून रोहित पवार आक्रमक
  • शेगाव ते नागपूर ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा
  • ४ ते ९ डिसेंबरदरम्यान निघणार न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा
 

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस घोषणा होत नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या ४ डिसेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर असा न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा थेट विधानसभा अधिवेशनापर्यंत धडकणार आहे. (Rohit Pawar)

विदर्भातील पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर रोहित पवार यांनी ही घोषणा केली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं. मात्र, तरीही सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या!

रोहित पवार यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अनेक मागण्या मांडल्या आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर भूमिहीन शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. फळबागांसाठी प्रति हेक्टर दीड लाख रुपये आणि फळबागा जगवण्यासाठी ६० हजार रुपयांची अतिरिक्त मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Harshwardhan Sapkal : ‘इतके दिवस झोपले होते का?’ सुनील तटकरेंवर हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

याशिवाय एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवावी आणि दुष्काळी भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, असे मुद्देही त्यांनी मांडले.

‘बळीराजा दुष्काळाच्या वणव्यात होरपळतोय’

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना रोहित पवार यांनी रब्बीच्या पेरणीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या दाव्यानुसार, यंदा रब्बीची पेरणी केवळ १७ टक्क्यांवर म्हणजे १५ ते १६ लाख हेक्टरवर झाली आहे. १९७२ च्या दुष्काळातही ४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, असं सांगत त्यांनी यंदाच्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित केलं. सरकार केवळ मदतीच्या घोषणा करण्यात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आता ४ ते ९ डिसेंबरदरम्यान निघणाऱ्या या मोर्चातून शेतकऱ्यांचे प्रश्न थेट नागपूरच्या अधिवेशनात मांडले जाणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाला सरकार कसा प्रतिसाद देणार, याकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवार यांचा ट्रॅक्टर मोर्चा कधी निघणार आहे?

    Ans: रोहित पवार यांनी ४ डिसेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर असा न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

  • Que: रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी किती मदत मागितली आहे?

    Ans: शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, भूमिहीन शेतमजुरांना २५ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रति हेक्टर दीड लाख रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.

  • Que: रोहित पवार यांच्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत?

    Ans: शेतकरी मदत, फळबागांसाठी अनुदान, एक रुपयात पीकविमा योजना, मायक्रो फायनान्स कर्जवसुली थांबवणे आणि चारा छावण्या सुरू करणे या प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: Rohit pawar shegaon to nagpur farmers tractor march december 2026 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • drought news
  • Farmer Protest
  • Maharashtra Drought 2026
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको
1

Satara News : माण तालुक्यात चारा छावण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर! बिजवडीत २३ नोव्हेंबरला रास्ता रोको

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन
2

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांचे डोके ठीक आहे ना? घातपाताचे पुरावे नसताना केवळ संशयाचे धुकेच
3

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांचे डोके ठीक आहे ना? घातपाताचे पुरावे नसताना केवळ संशयाचे धुकेच

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण
4

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर; अमोल कोल्हे अन् छगन भुजबळ यांच्यात खलबतं, चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.