पुणे : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात राजभवन येथे लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या संसदीय कार्याविषयी माहिती दिली. अधिवेशनातील विधेयके, विविध विषय आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ कामाबाबत माहिती दिली. अधिवेशन काळातील पुढील कामाबाबत बिर्ला यांचे मार्गदर्शन घेतले. डॅा. गोर्हेनी त्यांचे महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.