Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या श्री आगमन मिरवणुकांमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2026 | 09:10 AM
ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Follow Us
Follow Us:

सातारा : श्री आगमनाच्या जल्लोषासाठी सज्ज झालेल्या सातारा शहरातील राजवाडा परिसरात मंगळवारी (दि.8) सायंकाळी अचानक आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने लगतच्या आणखी एका प्रतिकृतीला कवेत घेतल्याने घटनास्थळी अक्षरशः धावपळ उडाली. या दुर्घटनेत मंडळाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ठेवलेला जनरेटर जळून खाक झाला. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. राजवाडा परिसरात श्री आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच ड्रॅगनच्या प्रतिकृतीला आग लागल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. आग वेगाने पसरू लागल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिका अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली. त्याचवेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचीही मदत घेण्यात आली. दोन अग्निशमन यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, मंडळाचा जनरेटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळाला.

दरम्यान, राजवाडा बसस्थानकासमोर श्री आगमन सोहळ्यामुळे मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर निर्माण झाले. आगीची घटना घडताच सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या श्री आगमन मिरवणुकांमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रतिकृती, विद्युत उपकरणे, जनरेटर आणि गर्दी यांचा मेळ घालताना आवश्यक ती खबरदारी घेतली जाते का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी घटनेची दूरध्वनीवरून माहिती घेतली. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका

Web Title: Dragon flared up and panic erupted in the palace in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
2

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
3

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
4

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.