उमरखेड तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच पिकांवर रोगराईचे सावट, वाढ खुंटली
प्रवीण शिंदे, सांगली : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील मिरज, शिराळा, कडेगाव, खानापूर या तालुक्यांचा समावेश आहे, मात्र शासनाच्या चुकीच्या ट्रिगर पद्धतीने दुष्काळाचे ब्रँडअँबेसिटर म्हणून ओळख असणारे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगावला दुष्काळग्रस्त यादीतून शासनाने वगळले आहे.
दुष्काळासाठी लागू केलेल्या ट्रिगर पद्धतीमुळे निम्मा जिल्हा दुष्काळी सवलतीपासून वंचित राहण्याची भीती आहे. पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून राज्य शासनाने राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू केला आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील मिरज, शिराळा, खानापूर व कडेगाव या चार तालुक्यांचा समावेश असल्याने येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर जे तालुके दुष्काळाच्या सर्वाधिक यातना भोगत आहेत, नेमके तेच जत, कवठेमहांकाळ, तासगाव व आटपाडी तालुके चुकीच्या ट्रिगर पद्धतीने वंचित राहिले आहेत.
असा लागू होतो ट्रिगर
पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस तथा पावसाचा खूप दिवसांचा खंड, जमिनीतील पाणी पातळीत घट, पिकपेरा व अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट तथा संपूर्ण पिके वाया, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्रोताची सद्य:स्थिती, अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात येतो, यापूर्वी हा महसूल विभागाकडून प्रत्यक्ष पाहिनी करून होत असे. यावेळी खासगी कंपनीच्या ॲपद्वारे केल्याने ही घोडचूक झालेली आहे.
‘महा मदत’ॲपने केला घात
खरीप- २०२३ हंगामात दुष्काळाचे मूल्यांकन ‘महा- मदत’ प्रणालीद्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ४३ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर- टू लागू झालेल्या तालुक्यांमधील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र, नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या ‘महा- मदत’ ॲपचा वापर केला आहे. अत्यंत चुकीच्या माहितीच्या आधारावर अहवाल शासनाला सादर झाल्याने टँकर सुरू असणारे तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
३१ गावांत टँकरने पाणी
जिल्ह्यातील ३१ गावांत ३३ टँकर मंजूर आहेत.सद्यस्थितीत जत तालुक्यातील २६ गावांना २९ तर आटपाडी तालुक्यातील ५ गावांत ४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही हे तालुके दुष्काळग्रस्त यादीत नाहीत. पावसाळ्यात राज्यात १६ जुलैअखेर सर्वांत कमी पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात झाली आहे. सांगलीत १६ जुलैअखेर सरासरी १८२.४ मिमी पाऊस पडतो, यंदा केवळ ५२.६ मिमी पाऊस झाला आहे.
[blockquote content=”जत, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव या तालुक्यांची ओळखच दुष्काळ आहे. निसर्गाच्या निर्मितीपासून इथं पाऊस कमी पडतो, या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची प्रतीक्षा आहे.” pic=”https://www.navarashtra.com/wp-content/uploads/2023/11/suresh-khade-1-jpg.webp” name=”-सुरेश खाडे, पालकमंत्री”]
[blockquote content=”राज्यात सर्वात कमी पर्जन्यमान सांगली जिल्ह्यात आहे. जत सारख्या दुष्काळी तालुक्यावर नागपूरच्या ॲपने जो अहवाल सादर केला आहे, तो वास्तवाला धरून नाही, टँकर सुरू असलेल्या ठिकाणी दुष्काळ नाही, अतिवृष्टी होणाऱ्या ठिकाणी दुष्काळ ही कुठली पद्धत, या ॲप विरोधात विधिमंडळात आवाज उठवणार आहे.” pic=”https://www.navarashtra.com/wp-content/uploads/2023/11/Vikram-Savant-jpg.webp” name=”- विक्रम सावंत, जत विधानसभा”]
[blockquote content=”ट्रिगर १ व २ लागू नसला तरी जून ते सप्टेंबर या काळात पावसाच्या कालावधीत एकूण ८५ दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरणी होऊनही पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे नुकसानीचा विचार करून चार तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी शिफारस शासनाकडे केली आहे.” pic=”https://www.navarashtra.com/wp-content/uploads/2023/11/dr-raja-dayanidhi-jpg.webp” name=”- डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली “]