Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रग्ज माफिया ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात; ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी

ड्रग्ज माफिया ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात दाखल झाला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे व राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 26, 2023 | 03:04 PM
ड्रग्ज माफिया ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात; ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात दाखल झाला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे व राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. ललितचा भाऊ भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांच्या पोलीस कोठडीत २९ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयातून चालविल्या जाणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसह १४ जणांना अटक केली. याटोळीवर साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.

ललितसह आठ साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यांना विशेष न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले. अमली पदार्थनिर्मिती, विक्री, वितरणात ललित व अरविंद लोहरे मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. अमली पदार्थ तस्करीत आणखी काहींचा समावेश आहे का, या दृष्टीने तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील ॲड. विलास पटारे यांनी युक्तिवादात केली. पोलिसांनी कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात सादर केलेले मुद्दे नवीन नाहीत. आरोपींना त्रास देण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करत असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

आरोपींचे तपासात असहकार्य

टोळीतील हरीश पंत, अरविंद लोहरे, इब्राहिम शेखच्या मोबाइल संपर्काचे तांत्रिक विश्लेषण केले असून, विश्लेषणातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी तपासात असहकार्य करत नसल्याने त्यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. आरोपींच्या बँक खात्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बँक व्यवहारांची चौकशी करायची आहे. आरोपी इब्राहिम शेख नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

Web Title: Drug mafia lalit patil back in yerawada jail judicial custody of four including lalit nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 03:04 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Lalit Patil case
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.