DSP IPS Anjana Krishna of Karmala Tehsil clashed with Ajit Pawar solapur
Who is IPS officer Anjali Krishna : सोलापूर : माढा तालुक्यामध्ये अवैध प्रकारे खडी उपसा सुरु होता. यावर धडक कारवाई करणाऱ्या माढाच्या डेप्युटी एसपी अंजली कृष्णा या जोरदार चर्चेमध्ये आल्या आहेत. बेकायदेशीर खडी उपसा रोखण्याची कारवाई करताना अंजना कृष्णा या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडल्या आहेत. महिला अधिकाऱ्यांवर दमदाटी करणाऱ्या अजित पवारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर अजित पवारांना थेट भिडणाऱ्या अंजना कृष्णा कोण आहेत असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडला आहे.
सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये मुरूम उपसा होत असल्याची तक्रार आली होती. ही तक्रार मिळताच तहसील अधिकारी आणि डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांनी, पोलील दल घेऊन कारवाई करण्यासाठी तेथे पोहोचल्या. प्रशासनाची कारवाई सुरू असताना, राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ता बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला. यानंतर अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. अजित पवारांशी अंजना कृष्णा यांना फोनवर बोलण्यास सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंजली कृष्णा यांनी अजित पवारांशी संवाद साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अंजली कृष्णा यांनी अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या फोनवर फोन करण्यास सांगितले. यावेळी अजित पवारांनी त्यांचा एकेरी उल्लेख करत महिला अधिकाऱ्याला धमकावले. त्या फोनवर अजित पवार म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय, तुम्ही तुमची कारवाई थांबवा आणि तिथून निघून जा. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा. मी तुम्हाला कारवाई तात्काळ थांबवण्याचा आदेश देतो, असे त्यांनी सांगितलं. यावर अंजली कृष्णा यांनी की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात. असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची ओळख पटवण्याची, पडताळणी करण्याची मगाणी केली. ते ऐकून अजित पवार भडकले. तुम्ही मला कॉल करायला सांगताय? एवढी हिम्मत वाढली.. तुमच्यावर अॅक्शन घेईन अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली कृष्णा यांच्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जोरदार चर्चेत असलेल्या आयपीएस अंजना कृष्णा सध्या करमाळा तहसीलच्या डीएसपी आहेत. अंजना कृष्णा 2023 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. मागील दोन वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. अंजना कृष्णा या मूळच्या केरळमधील तिरुवनंतपुरम येथील आहेत. त्यांचे वडील तिथे एक लहान कपड्याचे दुकान चालवतात, तर आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अंजना कृष्णा यांनी शालेय शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून पूर्ण केले आणि नीरमंकारा येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमन येथून बीएससी गणितात पदवी प्राप्त केली. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२२ मध्ये एआयआर-३५५ रँक मिळवला. अंजली या प्रामाणिकपणा, दृढनिश्चय आणि कुशाग्र प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखली जाते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट भिडल्यामुळे अंजना कृष्णा या जोरदार चर्चेत आल्या आहेत.