
Maharashtra Politics : 'अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत येतील'; 'या' बड्या नेत्याचा दावा
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकत्र येत निवडणूक लढवली. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या असून, महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत ही तर्कवितर्क लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने शरद पवार महाविकास आघाडीत राहणार नाहीत का, असा सवाल विचारला होता. यावर त्यांनी उलट प्रश्न उपस्थित करत शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का करत नाही? असे म्हटले. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही एकत्रितपणे महाविकास आघाडीत दिसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
हेदेखील वाचा : Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला
दरम्यान, अजित पवार यांचे मन कुटुंबाकडे असून, ते अखेर शरद पवारांसोबतच जाणार, असे भाकीतही राऊत यांनी व्यक्त केले. शरद पवार हे आधीपासूनच महाविकास आघाडीचा भाग आहेत, तर अजित पवार सध्या सत्ताधारी युतीत असले तरी त्यांचा आघाडीशी संपर्क कायम आहे, असे त्यांनी सांगितले. दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. अजितदादांना शेवटी एक भूमिका घ्यावीच लागेल, असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.
हेदेखील वाचा : Sindhudurg Zilla Parishad Election : जिल्हा परिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले
महायुतीतील घटक पक्षांत झाली बिघाडी
काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले असून, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. काँग्रेसच्या प्रचारात राहुल पाटील गट (भोगावती साखर कारखाना संचालक गट) सक्रिय झाला आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाला शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत पाठिंबा मिळाला असून तालुक्यातील पाचही गटांत एकमुखी उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र, महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत न झाल्याने भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह प्रत्येक पक्षाने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले आहेत.