Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे…; अजित पवार यांनी दिली माहिती

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना प्रकल्प या पंचवार्षिक योजनेत मार्गी लागणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2026 | 03:42 PM
कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे...; अजित पवार यांनी दिली माहिती

कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार, या प्रकल्पामुळे...; अजित पवार यांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना लवकरच मार्गी लावणार
  • अजित पवार यांनी दिली माहिती
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ
बारामती : कऱ्हा- नीरा उपसा सिंचन योजना प्रकल्प या पंचवार्षिक योजनेत मार्गी लागणार असून, या प्रकल्पामुळे तालुक्यातील जानाई शिरसाई व व पुरंदर सिंचन योजनेच्या मधला टापू असलेल्या जिरायती भाग सिंचनाखाली येईल,१००० कोटीची ही योजना असून, या योजनेच्या माध्यमातून नीरा नदीतून अडीच टीएमसी पाणी आणले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली.

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री कत्र कण्हेरी (ता. बारामती) येथे हनुमान मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पृथ्वीराज जाचक, पुरुषोत्तम जगताप, विश्वासराव देवकाते, राजवर्धन शिंदे, सचिन सातव,सतीश काकडे, संभाजी होळकर, किरण गुजर, धनवान वदक, अविनाश बांदल, संदीप बांदल, शिवाजी काळे, अविनाश गोफणे,दयानंद लोंढे, आदींसह इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नीरा नदीतून वाहून जाणारे पाणी त्याच काळात या योजनेच्या माध्यमातून उचलली जाणार असून, त्याचा फायदा जिरायती भागातील शेतीला होणार आहे, या माध्यमातून बारामती तालुक्याचे परिवर्तन करायचे असून हे परिवर्तन ऐतिहासिक आहे. बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन मापदंड करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. तुम्ही सर्वांनी साथ दिल्यामुळे, हे शक्य झाले. हे मी कधीही विसरणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये तोडीस तोड उमेदवार असतानाही सर्वांना उमेदवारी देणे शक्य नव्हते, मात्र सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे, असं पवार यांनी सांगितले.

प्रत्येक समाज घटकाला आपण विविध ठिकाणी संधी देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. जातीपतीचा आपण कधीही विचार केला नाही. निरा वाघच जिल्हा परिषद गटांमध्ये अभिजीत देवकाते यांच्या पत्नीकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने संविधानानुसार त्यांना उमेदवारी दिली आहे. मात्र याबाबत कोणीही गैरसमज निर्माण करू नये. बारामती शहरात काही ठिकाणी सर्वसाधारण साठी जागा असताना त्या ठिकाणी अनुसूचित जातीतील अभिजीत चव्हाण व बिरजू मांढरे यांना संधी दिली आहे. बारामती मार्केट कमिटीच्या उपसभापतीपदी सकट यांना संधी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील बनसोडे यांच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. अनेक अनुसूचित जातीतील न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती तालुक्यातून चांगले उमेदवार आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, लाडक्या बहिणींचे देखील सहकार्य महत्त्वाचे आहे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

या प्रचार सभेत गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. विविध निवडणुकांमध्ये प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक वेळा तोडीस तोड असलेले उमेदवार असूनही त्यांना उमेदवारी देता येत नाही. मात्र उमेदवारी न मिळाल्याने काहीजण नाराज होऊन पक्षाच्या अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. मात्र त्यांना आपण विविध ठिकाणी महत्त्वाची संधी दिलेली असते, याचा उल्लेख करत संबंधित दोन पदाधिकाऱ्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटावे, अशी सूचना दिली.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत

Web Title: Deputy chief minister ajit pawar has responded to the karha neera upsa irrigation scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Election News

संबंधित बातम्या

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?
1

ओतुर-धालेवाडीत प्रचाराचा धडाका! आरोप- प्रत्यारोप सुरुच; कोण मारणार बाजी?

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर
2

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

Maharashtra Politics : ‘अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत येतील’; ‘या’ बड्या नेत्याचा दावा
3

Maharashtra Politics : ‘अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत येतील’; ‘या’ बड्या नेत्याचा दावा

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?
4

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.