Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगळवेढ्यात बदलत्या हवामानामुळे रुग्ण वाढले ; शासनाचा आरोग्य विभाग कर्मचार्‍याच्या रिक्त पदामुळे सलाईनवर

मंगळवेढा तालुक्यात डेंग्यू सदृश्य, ताप, सर्दी, खोकला व चिकणगुण्या आदींचे रुग्ण वाढत असून ते खासगी  रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आरोग्य विभागाकडे कर्मचार्‍यांची विविध पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाच सलाईनवर असल्याच्या प्रतिक्रीया सध्या व्यक्त होत आहेत.

  • By Aparna
Updated On: Nov 13, 2023 | 04:13 PM
Thaman of mysterious fever in Uttar Pradesh; Sensation of 100 deaths

Thaman of mysterious fever in Uttar Pradesh; Sensation of 100 deaths

Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात डेंग्यू सदृश्य, ताप, सर्दी, खोकला व चिकणगुण्या आदींचे रुग्ण वाढत असून ते खासगी  रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान आरोग्य विभागाकडे कर्मचार्‍यांची विविध पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाच सलाईनवर असल्याच्या प्रतिक्रीया सध्या व्यक्त होत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे मानवी शरिरावर परिणाम होवून बालके, वृध्द व तरुणवर्ग सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यू सदृश्य आजाराला बळी पडले आहेत. दरम्यान महसूल विभागातील एक महसूल अव्वल कारकून हे डेंग्यूच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्यांना बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. निवडणूकीच्या कामाचा पडणारा ताण व बदलते हवेतील वातावरण यामुळे मतमोजणीच्या दिवशीच त्या कर्मचाऱ्यांच्या अंगातील पेशी कमी झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना डॉक्टरच्या नियंत्रणाखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. सोलापूर येथे उपचार घेत आहेत.

अवकाळीने पुन्हा आजारात भर
ताप, सर्दी, खोकला, चिकनगुण्या आदी साथीने नागरिक हैराण आहेत. यामध्ये लहान बालके अधिक प्रमाणात आहेत. दामाजीनगर ग्रामपंचायतीने परिसरात सर्वत्र धूर फवारणी व पावडर फवारणी करुनही डासांचा उपद्रव कमी होत नसल्याने या आजाराला बळकटी मिळत आहेत. गेली दोन दिवस पडलेल्या रिपरिप पावसामुळे पुन्हा त्यात अधिक भर पडल्याचे जानकारांचे मत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून विविध कर्मचार्‍यांची रिक्त पदे असल्यामुळे तुटपुंज्या कर्मचार्‍यावर आरोग्य विभाग सुरु असल्याचे सांगण्यात आले.

परिणामी, रोगराईचे प्रमाण एकीकडे वाढत असताना आरोग्य विभागाच सलाईनवर असल्याच्या तिखट प्रतिक्रीया नागरिकामधून उमटत आहेत. मंगळवेढा शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायतीने व नगरपालिकेने तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीने धूर फवारणी व पावडर टाकून घेतल्यास डासांचा उपद्रव कमी होवून या रोगराईला अटकाव करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासकीय आरोग्य विभागाकडे डेंग्यू सदृश्य व इतर रुग्णाबाबत माहिती विचारल्यास हात झटकले जात असल्यामुळे निश्चित रुग्णांचा आकडा प्रसारमाध्यमांना मिळू शकला नाही.

Web Title: Due to changeable weather in mangalveda patients increased govt health department on saline due to employee vacancy nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 04:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Mangalwedha
  • Solapur News

संबंधित बातम्या

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
1

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी
3

शनिशिंगणापूर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना बंदी

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.