Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपुऱ्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घ्यावा लागतोय झाडाचा आधार; दोन वर्ग झाडाखाली

दवंडी जिल्हा परिषद शाळेत १ ते ५ वीचे वर्ग भरत असून, एकूण विद्यार्थीसंख्या ३१ आहे. या विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनाची जबाबदारी दोन शिक्षकांवर आहे. मात्र, दोनच वर्गखोल्या असल्याने पाच इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी अनेक वर्गाचे अध्यापन करावे लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2026 | 09:39 AM
अपुऱ्या खोल्यामुळे दोन वर्ग झाडाखाली

अपुऱ्या खोल्यामुळे दोन वर्ग झाडाखाली

Follow Us
Follow Us:
  • कोरचीच्या दंवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील अवस्था
  • सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार
  • शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज
गडचिरोली : एकीकडे डिजिटल शिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांची चर्चा सुरू असताना कोरची तालुक्यातील दंवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र चक्क झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. बेळगाव केंद्रातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ३१ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्यासाठी केवळ दोन वर्गखोल्या आणि दोन शिक्षक उपलब्ध आहेत. पाच वर्गांसाठी दोनच खोल्या असल्याने दोन वर्गांचे अध्यापन झाडाखाली घेण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

दवंडी जिल्हा परिषद शाळेत १ ते ५ वीचे वर्ग भरत असून, एकूण विद्यार्थीसंख्या ३१ आहे. या विद्यार्थ्यांच्या विद्यार्जनाची जबाबदारी दोन शिक्षकांवर आहे. मात्र, दोनच वर्गखोल्या असल्याने पाच इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी अनेक वर्गाचे अध्यापन करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांनाही अडचणी येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शाळेला अतिरिक्त वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याबाबत ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याची माहिती मुख्याध्यापिका रेषमा कंगाले यांनी दिली.

NMC Guidelines : ‘१००% खात्रीशीर उपचारांचे’ दावे आता पडणार महागात; NMC च्या नव्या गाईडलाईन्समुळे भ्रामक जाहिरातींना चाप

दरम्यान, कोरची शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या दंवडी गावातील शाळेची ही अवस्था शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार

शाळेला आवश्यक वर्गखोल्या उपलब्ध न झाल्यास पालकांचा सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता असून, भविष्यात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरही होऊ शकतो. त्यामुळे दंवडी शाळेसाठी तातडीने अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम मंजूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, पुरेशा आणि दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Due to lack of classrooms students are forced to rely on trees for their studies nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Gadchiroli News
  • School Education

संबंधित बातम्या

नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत
1

नक्षलवाद्यांच्या गोळीपासून बचावले, पण अंघोळीसाठी जाताच काळाने गाठले; जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.