Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती

राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2025 | 06:57 PM
ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक-त्रैमासिक पास योजना सुरु, परिवहनमंत्र्यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत
  • महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बस
  • १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस आहे. अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आझाद मैदानावर पुन्हा आरक्षणाचा एल्गार; कुणबीच्या महाप्रचंड मोर्चामुळे मुंबई परत होणार ठप्प?

पास योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये

उपलब्धता : ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील. (ई-शिवनेरी बससेवा वगळून)

मासिक पास:(३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवसांसाठी पास दिला जाईल.

त्रैमासिक पास: (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवसांचा पास उपलब्ध होईल.

सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.

फरक भाडे नियम: निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक १००% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल. महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

बेळगावसाठी 100 बसेस…

पीएम ई ड्राईव्ह योजनेंतर्गत बेळगावसाठी 100 बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अत्याधुनिक ई बसस्टँड निर्माण करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पुढीलवर्षी बेळगावच्या ताफ्यात 100 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून त्यादृष्टीने वेगाने पावले उचलण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांचा अनुभवही घेता येणार आहे.

प्रवाशांसाठी ‘दिवाळी भेट’! पंतप्रधान मोदींनी केले ‘Mumbai One Ticket App’ लाँच; तिकीट रांगेतून मिळणार कायमची सुटका

Web Title: E bus monthly and quarterly pass schemes launched by st for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
1

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत
2

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
3

Mumbai Metro: डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर
4

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.