पंतप्रधान मोदींनी केले 'Mumbai One Ticket App' लाँच (Photo Credit: Rushikesh Tapkir & X)
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर) मुंबईकरांसाठी एक मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मुंबई वन तिकीट ॲप’ लाँच केले असून, यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) लोकांचा प्रवास लक्षणीयरीत्या सोपा होणार आहे. हे ॲप्लिकेशन ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कवर काम करेल. हा ॲप लाँच झाल्यामुळे, आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होतील.
‘मुंबई वन तिकीट ॲप’मुळे मुंबईत सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे आता खूपच सोपे होणार आहे. प्रवाशांना आता वेगवेगळ्या प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. हे ॲप मेट्रो, मोनोरेल, लोकल ट्रेन आणि बस सेवांसाठी तिकिटे बुक करण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म प्रदान करेल. यामुळे प्रवाशांना तिकीट काउंटर किंवा टोकन मशीनवर रांगेत उभे राहण्याची गरज पूर्णपणे संपेल.
हे ॲप मुंबईतील अनेक मोठ्या सार्वजनिक वाहतूक सेवांना एकत्रित जोडते. यात खालील प्रमुख सेवांचा समावेश आहे:
Navi Mumbai Airport: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार पंख; नवी मुंबईतील विमानतळाचे उद्घाटन
या ॲपचा वापर अत्यंत सोपा आहे आणि यात सुरक्षिततेसाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत:
या ॲपमध्ये प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान ट्रेनच्या विलंबाची आणि पर्यायी मार्गांची रिअल-टाईम अपडेट्स मिळतील. तसेच, एकात्मिक SOS बटण देखील सुरक्षिततेसाठी उपलब्ध असेल.