Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

राज्याच्या बसच्या ताफ्यामध्ये नवीन बस दाखल होणार आहेत. केशरी आणि पांढऱ्या रंगाच्या या नवीन बसला स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात येणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 04:13 PM
एसटी बसचा प्रवास आणखी सुकर होणार; तब्बल 3000 नव्या स्मार्ट बसेस रस्त्यावर धावणार

एसटी बसचा प्रवास आणखी सुकर होणार; तब्बल 3000 नव्या स्मार्ट बसेस रस्त्यावर धावणार

Follow Us
Follow Us:
  • लालपरी बसला मिळाले नवीन नाव
  • नवीन बसला म्हटले जाणार राजमाता जिजाऊ
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Rajmata Jijau ST New Name : मुंबई :  महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात (ST News) लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी 3 बाय 2 आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या व्या बसला ‘ हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या नवीन बसचा रंग हा भगवा आणि शुभ्र पांढरा असणार आहे. केशरी व पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार आहेत असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

इतिहासाचा सन्मान, प्रवासात आराम

याबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब! त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटी च्या नवीन बसेसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केले आहे. अर्थात, एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.”  असे सरनाईक म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

अधिक आसन क्षमता — प्रवाशांना मोठा दिलासा

सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण 40 प्रवासी इतकी असताना, नव्या बसेसमध्ये 55 प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या तब्बल 15 प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे. असे मंत्री सरनाईक म्हणाले.

हे देखील वाचा : ११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम

“राजमाता जिजाऊ” हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. लवकरच इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या बसेस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: New orange and white msrtc bus named rajmata jijau said pratap sarnaik st bus news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप
1

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय
2

MSRTC Land Development: एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

Pratap Sarnaik : ‘हिंदूंच्या सणाला विरोध का?’ नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; सरनाईकांचा महापालिकेला थेट सवाल
3

Pratap Sarnaik : ‘हिंदूंच्या सणाला विरोध का?’ नवरात्रोत्सवाच्या मैदानावरून मीरा-भाईंदरमध्ये वाद; सरनाईकांचा महापालिकेला थेट सवाल

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
4

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.