Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : ई-पॉस प्रणालीला बगल; डीएपीची बेकायदेशीर विक्री! २७ शेतकऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने विक्री

Washim : खरीप हंगामाच्या तोंडावर ‘डीएपी’ खताच्या विक्रीत मोठा घोळ उघड झाला असून ई-पॉस प्रणालीला बगल देत २४० बॅगची बेकायदेशीर विक्री करण्यात आल्याचे समोर आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 02, 2026 | 08:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वाशिम : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात खतांच्या अनियमिततेचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. ‘डीएपी’ खताच्या विक्रीत मोठा घोळ समोर आला असून, शासनाच्या ई-पॉस प्रणालीला बगल देत तब्बल २४० बॅगची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. या प्रकरणी २७ शेतकऱ्यांच्या नावावर व्यवहार दाखवण्यात आले असून, प्रत्यक्षात नियमबाह्य पद्धतीने खत विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी विभागाच्या पथकाने वाशिम येथील ‘मोरया कृषी सेवा केंद्रा’ची तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विक्रेत्याकडून खतविक्री करताना शासनाच्या ‘आयएफएमएस’ आणि ‘ई-पॉस’ प्रणालीचा वापर करण्यात आलेला नव्हता. त्याऐवजी ऑफलाइन पद्धतीने व्यवहार करून नोंदी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकानातील स्टॉक रजिस्टर, विक्री पुस्तके आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली.

Matheran News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; पार्कींगसाठी नवी व्यवस्था; वाहतूक कोंडींचा प्रश्न कायमचा मिटला

तपासादरम्यान २७ शेतकऱ्यांच्या नावाने व्यवहार दाखवण्यात आले, मात्र त्यांना पक्की देयके देण्यात आलेली नव्हती. खत नियंत्रण आदेशातील नियमांचे उल्लंघन करत काही खतांची विक्री कोणत्याही अधिकृत नोंदीशिवाय केल्याचेही उघड झाले. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी कृषी गुणनियंत्रण अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी वाशिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मोरया कृषी सेवा केंद्राचे मालक ज्ञानेश्वर रामकृष्ण देवळे यांच्यासह बारामती येथील खत पुरवठादार कंपनीचे मनोज कोरतकर, अमोल राठोड आणि पूजा राठोड अशा पाच जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai : एअरपोर्ट लिंक रोडवर अपघात; विमानतळ मार्ग धोकादायक असल्याची भिती

कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील खतविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत राहणे अत्यावश्यक असताना अशा प्रकारांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील इतर कृषी सेवा केंद्रांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना अधिकृत पावती घेणे आणि व्यवहाराची खात्री करणे आवश्यक असल्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: E pos system bypassed illegal sale of dap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

मलकापुरातील पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा; ५० दिवसांत उपाययोजनांचे प्रशासनाकडून आश्वासन
1

मलकापुरातील पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा; ५० दिवसांत उपाययोजनांचे प्रशासनाकडून आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.