Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineering Admission 2026: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या खिशावर दरोडा! सीईटी सेलकडून १७ कोटींऐवजी १०६ कोटी जमा करण्याचा डाव

CET Cell Engineering: एखादी ऑनलाईन प्रणाली राबविण्यासाठी एवढी जास्त रक्कम केवळ एका प्रवेश प्रक्रियेमार्फत सीईटी सेल जमवते, अभियांत्रिकी वगळून जवळपास २५ पेक्षा जास्त अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सीईटी सेल राबवत असते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 28, 2026 | 02:40 PM
Engineering Admission 2026

Engineering Admission 2026

Follow Us
Follow Us:
  • २०२५-२६ पासून ठरलेल्या धोरणानुसार, १७ कोटींऐवजी चक्क १०६ कोटी जमा करण्याचा सीईटी सेल
  • राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या ३७२ होती आणि जागा होत्या
  • सीट लागल्यानंतर ‘जागा स्वीकृती शुल्क’ म्हणून एक हजार रुपये फी आकारली जायची
Engineering Admission 2026: अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत जागा स्वीकृती शुल्काच्या नावाखाली एरवी सीईटी सेलला दरवर्षी १७ कोटी रुपये मिळत असताना, यंदाच्या वर्षी मात्र २०२५-२६ पासून ठरलेल्या धोरणानुसार, १७ कोटींऐवजी चक्क १०६ कोटी जमा करण्याचा सीईटी सेल आणि शासन यांचा संयुक्त प्रयत्न दिसतो आहे. अर्थात या निर्णयाचा जबर फटका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

यासंदर्भात सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, दोन तीन वेळा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या ३७२ होती आणि जागा होत्या १,७७,९८५, त्यावेळी प्रवेश प्रक्रियेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कुठल्याही राऊंडमध्ये सीट लागल्यानंतर ‘जागा स्वीकृती शुल्क’ म्हणून एक हजार रुपये फी आकारली जायची. त्यानुसार सीईटी सेलकडे १७ कोटी शुल्क जमा व्हायचे, मात्र यंदा पहिल्या ते तिसऱ्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्याला सीट मिळाली तर त्याला प्रत्येक राऊंडमागे ठरावीक रक्कम अदा करावी लागणार आहे.

Facebook Baned PM Modi Video: फेसबुकने बॅन केला नरेंद्र मोदींचा तो व्हिडीओ; नेमकं घडलं काय?

 

शुल्कवाढ आहे अन्यायकारक

दरवर्षी प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी सीईटी सेलसारख्या यंत्रणेला १७कोटींच्या जवळपास रक्कम फक्त अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियामार्फत मिळत असताना अचानक सहापट करण्यात आलेली ही फी वाढ विद्यार्थ्यांवर व त्यांच्या पालकांवर अन्याय करणारी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जर ही रक्कम मुलांच्या महाविद्यालयीन शुल्क मधून वजा होणार असेल तर एवढी आकारणी समजू शकेल, अन्यथा ही शासनाने भर दिवसा केलेली लुटमार आहे, असे विद्यार्थी म्हणतात, पण ही रक्कम केवळ सीईटी सेल त्याची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आकारत असेल तर ते मात्र अत्यंत चुकीचे आणि अन्यायकारक असल्याची आणखी एक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

 

२५ पेक्षा जास्त अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सीईटीमार्फत

एखादी ऑनलाईन प्रणाली राबविण्यासाठी एवढी जास्त रक्कम केवळ एका प्रवेश प्रक्रियेमार्फत सीईटी सेल जमवते, अभियांत्रिकी वगळून जवळपास २५ पेक्षा जास्त अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सीईटी सेल राबवत असते. यावर्षी मात्र धोरण बदलले आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी जागा स्वीकृती शुल्क प्रत्येक राऊंडमागे घेतले जाणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

66 रियल आहे. प्रत्येक रकमध्ये याला चांगला पर्याय मिळाल्यान एकदम सहापट जागा स्वीकृती शुल्क वाढ जाचक असून, ही की नॉन दरवेळी त्याला जादा जागा स्वीकृती शुल्क आकारणी संविधानिक वाटत नाही. सीईटी सेल चालवण्यासाठी मुळात किती खर्च येतो आणि सगळी किती रक्कम जमा होते याचा हिशेब कुठेच दिला जात नाही, सीईटी सेल फक्त याचे भांडवल करून पालकांकडून १०६ कोटी वसूल करत आहे, है विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.
योगेश्वर मुझे, लातूर.

आंदोलनानंतर नवा वाद; सरकारच्या आश्वासनानंतरही अटकसत्र सुरूच, विद्यार्थ्यांना विश्वासघाताची भीती

राऊंडनुसार स्वीकृती शुल्क (Acceptance Fee) असे आहे: पहिला राऊंड १,००० रुपये, दुसरा राऊंड २,००० रुपये आणि तिसरा राऊंड ३,००० रुपये.शुल्क तपशीलपहिला राऊंड: १,००० रुपयेदुसरा राऊंड: २,००० रुपयेतिसरा राऊंड: ३,००० रुपये

 

Web Title: Education engineering admission 2026 cet cell seat acceptance fee hike 106 crores controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • CET Exam
  • Educational News
  • Marathi News
  • national news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.