Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या ‘या’ महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!

निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे निवडणुकीला कलाटणी मिळणार का? असे प्रश्न विचारले जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 14, 2026 | 08:43 PM
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या 'या' महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या 'या' महत्वाच्या नेत्याला हृदयविकाराचा झटका!

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगरमधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका
  • एकनाथ शिंदेंकडून विचारपूस
  • अहिल्यानगरच्या निवडणुकीला कलाटणी मिळणार?
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमधील शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अनिल शिंदे हे केवळ जिल्हाप्रमुखच नव्हे, तर ते स्वतः प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवार आहेत. याशिवाय, शिवसेना शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. सोमवारी रात्री त्यांच्या घरी निवडणूक यंत्रणेतील तपास पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी ते कुटुंबासह घरी उपस्थित होते. घरातील महिला आणि लहान मुले या प्रकारामुळे घाबरून गेली होती.

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड

या छाप्यात कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे सांगण्यात येत असले, तरी या कारवाईदरम्यान अनिल शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे समजते. याच चर्चेदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. शिंदे यांना यापूर्वीही हृदयविकाराचा त्रास होता. नोव्हेंबर महिन्यातही त्यांना अशाच त्रासाला सामोरे जावे लागले होते.

महापालिका निवडणुकीत महायुती तुटल्यामुळे शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ऐनवेळी युती तुटल्याने काही प्रभागांमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ पक्षावर आली. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडींचा मोठा ताण अनिल शिंदे यांच्यावर होता. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या छाप्यामुळे ते प्रचंड तणावाखाली गेले आणि त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते.

त्यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेसह विविध पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात मोठी गर्दी होती.

हॅबिल्डची ८व्या जागतिक विक्रमाला गवसणी! एकाच दिवशी ९.३ लाख जणांचा ऑनलाइन योग सत्रात सहभाग

शिंदेंना उपचारासाठी पुण्याला हलविले

अनिल शिंदे यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रशासन आणि युतीवर कुटुंबाचा संताप

या घटनेनंतर शिंदे कुटुंबीयांनी प्रशासन आणि भाजपा-राष्ट्रवादी युतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनिल शिंदे यांच्या पत्नी आणि माजी महापौर शीला शिंदे यांनी, “जर शिंदे यांना काही झाले, तर छापा टाकणारे अधिकारी आणि यामागील सूत्रधारांना सोडले जाणार नाही,” असा इशारा दिला. त्यांनी या घटनेला भाजपा-राष्ट्रवादी युती जबाबदार असल्याचा आरोप केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस

अनिल शिंदे आणि शीला शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या घटनेची संपूर्ण माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असून, गरज भासल्यास एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. सध्या अनिल शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.

या संपूर्ण घटनेमुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार का, शिंदे गटाला सहानुभूतीचा फायदा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Eknath shinde ahilyanagar district chief anil shinde admiitted in hospital due to heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

“उमेदवारांचा लेखाजोखा…”, आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना ‘हे’ महत्वाचे आवाहन
1

“उमेदवारांचा लेखाजोखा…”, आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना ‘हे’ महत्वाचे आवाहन

Maharashtra Politics : “हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला” उबाठाच्या दुटप्पीपणावर उदय सामंत यांची सडकून टीका
2

Maharashtra Politics : “हिंदी भाषा सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला” उबाठाच्या दुटप्पीपणावर उदय सामंत यांची सडकून टीका

Shivsena News : “विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा” शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका
3

Shivsena News : “विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा” शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका

Ahilyanagar News: शेतकऱ्यांना फसवलं? सोलर पंप योजनेत शेतकऱ्यांची थट्टा
4

Ahilyanagar News: शेतकऱ्यांना फसवलं? सोलर पंप योजनेत शेतकऱ्यांची थट्टा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.