Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही; पाकिस्तानच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया

तुर्की सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला म्हणून त्यांना पाकिस्तानमधून धमकी येत आहे, परंतु व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2025 | 04:49 PM
व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही; पाकिस्तानच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया

व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही; पाकिस्तानच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया

Follow Us
Follow Us:

पुणे : तुर्की सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला म्हणून त्यांना पाकिस्तानमधून धमकी येत आहे, परंतु महायुतीचे सरकार त्यांच्या पाठीशी असून, व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशदा येथे आयोजित राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या परिषदेसाठी शिंदे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, नगर विकास विभागाच्या माध्यमातून यशदा येथे शहर विकासासाठी या परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी येथे उपस्थित आहेत. शहरातील अडचणी, धोरणे आणि भूमिका, नवीन नियम, विकास आराखडा आणि शहर विकास याबाबत या परिषदेत भर दिला जाणार आहे. राज्यातील विविध शहरातील त्यांच्या भागातील माहिती सांगणार असून, त्यावर चर्चा करणार आहेत. यातून एक धोरणतात्मक निर्णय घेऊन शहरांचा समतोल विकास झाला पाहिजे यावर येथे ऊहापोह होणार आहे. सर्व शहरांना न्याय मिळाला पाहिजे हे आमच्या सरकारचे धोरण असून, नियोजनबध्द विकास झाला पाहिजे यासाठी काम करण्यास आमचे प्राधान्य असेल.

पीएमआरडीएचा विकास आराखडा जरी माझ्या कार्यकाळात झाला असला तरी तो रद्द झाला कारण त्यात काही त्रुटी असल्याचे शिंदे यांनी यावेळी मान्य केले. विकास आराखडा हा त्या शहरातील नागरिकांच्या विकासाचा विचार करून झाला पाहिजे. त्यामुळे नियोजित शहर कसे असेल याचा विचार करून व त्रुटी दूर करून नव्याने हा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीबाबत जे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोग काम करत असून, ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. महायुतीमध्ये लोकसभा, विधानसभा लढलो, मोठ्या मताधिक्याने जिंकलो त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार असून, त्याही मोठया मताधिक्क्याने जिंकू असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यभर भारतीय लष्कराचे तिन्ही दल यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढली गेली आहे. भारतीय लष्कराचे अभिनंदन करतो आणि लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले, ठोस निर्णय घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Eknath shinde has responded to pakistans threat to traders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • Eknath Shinde
  • PM Narendra Modi
  • pune news

संबंधित बातम्या

Eknath Shinde: दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’
1

Eknath Shinde: दुष्काळग्रस्त बळीराजासाठी एकनाथ शिंदेंचे आवाहन; ‘सणांवरील खर्च कमी करा, बचतीतून शेतकऱ्यांना मदत करा’

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
3

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
4

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.