एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल...5 डिसेंबरचा मुहूर्त टळणार? (फोटो सौजन्य-X)
Eknath Shinde News In Marathi: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचे गूढ जवळपास उकलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील. सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र 5 डिसेंबर रोजी अधिकृत घोषणा केली जाईल. यामध्ये सार्वधिक चर्चेत असणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाली नसल्याचे समोर आले. वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंना दोन दिवस आराम करण्याता सल्ला डॅाक्टरांनी दिला आहे. त्यांची डेंगी, मलेरिया याची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांनी सांगितले.
दरम्यान शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे बरी नसली तरी अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे शिंदे नव्या सरकारमध्ये रुजू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारमध्ये राहावे, अशी शिवसेना खासदारांची इच्छा आहे. अशा परिस्थितीत शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारू शकतात. बुधवारी मुंबईत होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत फडणवीस यांच्या नावावर मंजुरीची शिक्कामोर्तब होणार आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारामन यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे.
Maharashtra Caretaker CM Eknath Shinde has been rushed to Jupiter Hospital, in Thane as his health condition shows no sign of improvement. Doctors have advised the full examination of his health: Sources
(file pic) pic.twitter.com/EQmMCwiD7i
— ANI (@ANI) December 3, 2024
दुसरीकडे, नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी आजारपणामुळे सर्व बैठकी रद्द केल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांची पुढील बैठक कधी होणार हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र, सध्या सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपची सभा आयोजित करण्याची प्रतीक्षा असल्याचे शिवसेनेच्या बाजूने बोलले जात आहे.
शिंदे गटाकडून नव्या सरकारमध्ये गृहमंत्रालयासह बड्या मंत्र्यांची मागणी होत असून महाराष्ट्र मंत्रिमंडळ विभाजनावर अडकला असल्याची चर्चा आहे. मात्र, महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याची ग्वाहीही शिंदे देत आहेत. या सगळ्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज पुन्हा दिल्लीत येत असून, ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
भाजप नेते गिरीश महाजन यांना यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, ‘मी एकनाथजींना 30 वर्षांपासून ओळखतो. छोट्या-छोट्या बाबींवर नाराजी, राग, मतभेद असे काही नाही. आमचे ज्येष्ठ नेते देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी यावर निर्णय घेतील. आम्ही सुमारे दीड तास अतिशय सकारात्मक वातावरणात चर्चा केली. तीनही आघाडी पक्ष येत्या पाच वर्षांसाठी एकत्र काम करतील.