Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde News: आमचं कार्य सुवर्णाक्षरात लिहीलं जाईल; एकनाथ शिंदे स्पष्टचं बोलले

महायुतीमध्ये खातेवाटपावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. मात्र ऐनवेळी बैठकी रद्द करुन एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेल्याने ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 01, 2024 | 04:44 PM
Eknath Shinde News: आमचं कार्य सुवर्णाक्षरात लिहीलं जाईल; एकनाथ शिंदे स्पष्टचं बोलले
Follow Us
Close
Follow Us:

Eknath Shinde News:  मुंबईत सोमवारी महायुतीची बैठक होणार आहे. मी भाजपला पूर्ण पाठिंबा दिला असून मुख्यमंत्रीपदावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतील तेच अंतिम मानले जाईल, उद्याच्या बैठकीत सर्व काही ठरवले जाईल, अशा शब्दांत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.

यावेळी महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवरही मोठी चर्चाही झाली होती. त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार हेही जवळपास निश्चित झाले. पण त्यानंतर एकनाथ शिंदे कोणालाही न सांगता अचानक त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी दरे याठिकाणी निघून गेले. त्यामुळे सत्तास्थापनेतील पेचही वाढला. अखेर तीन दिवसांनी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा आपण भाजपसोबत असल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर, आमचे कार्य सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

EVM Hacking Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होतोय EVM हॅकिंगचा व्हिडीओ; निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्रात नवे सरकार स्थापनेवर एकनाथ शिंदे म्हणाले की, माझी भूमिका पूर्णपणे स्पष्ट असून आमचे काम सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. आमच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असून उद्याच्या बैठकीत सर्वकाही निश्चित होईल.  मुख्यमंत्रीपदाचा निर्णय अमित शाह आणि पंतप्रधान मोदी घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल,.

शनिवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री भाजपचे तर दोन उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे असतील, असे सांगितले होते. पण  शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न दिल्याने नाराजी आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि अमित शहा घेतील, असे ते उघडपणे सांगताना दिसत आहेत.

ऑटोमॅटिक कारपेक्षा मॅन्युअल कार चालवल्याने खरंच फायदा होतो का? जाणून घ्या

एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी सातारा येथून आज मुंबईत दाखल झाले. शनिवारीही शिंदे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना खूप ताप आणि घशाचा संसर्ग झाला होता. शिंदे यांच्या डॉक्टरांनी त्यांना औषधे देण्यात आली असून त्यांना बरे वाटत असल्याचे निवेदन जारी केले होते. दुसरीकडे,  महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.

महायुतीमध्ये खातेवाटपावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. मात्र ऐनवेळी बैठकी रद्द करुन एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. यामुळे ते नाराज असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत  संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधत,  शिरसाट म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी वाटते. काल त्यांचा ताप 105 वर होता. सत्तेचे समीकरण आता निश्चित झाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत येऊन आराम करतील. त्यानंतर उद्या शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर शिवसेनेचा कृती आराखडा ते सांगतील.”

Netflix यूजर्ससाठी मोठा धोका! हॅकर्स ‘अशा’ प्रकारे मिळवत आहेत वैयक्तिक डेटा, बँक खाती

Web Title: Eknath shinde said our work will be written in golden letters nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Government
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप
1

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
2

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला
3

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश
4

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.