
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहाराचे प्रकरण
धंगेकरांच्या मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांच्या फैरी
एकनाथ शिंदे यांचा धंगेकरांना निरोप
मुंबई/दिल्ली ;पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात धंगेकरांवर पक्षाकडून कारवाई होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर शनिवारी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले, “रवींद्र धंगेकरांना काय निरोप द्यायचा तो मी पाठवला आहे. महायुतीत मिठाचा खडा पडता कामा नये. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
पुण्यातील धंगेकरांच्या आरोपांबाबत विचारले असता, शिंदे म्हणाले, महायुतीत मतभेद किंवा बेबनाव होईल असे वक्तव्य टाळावे. मी यापूर्वीही पुण्यात याबाबत भाष्य केले आहे. धंगेकरांना पक्षाचा निरोप गेला आहे, त्यांच्याशी मी बोलणार आहे. धंगेकरांवर कारवाई होणार का, या प्रश्नावर शिंदे म्हणाले, निरोप गेला आहे. धंगेकर मला भेटतील, त्यांच्याशी चर्चा करेन.
धंगेकरांच्या आरोपांमुळे महायुतीत निर्माण झालेला तणाव आणि शिंदेंच्या या इशाऱ्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आगामी काळात धंगेकर आणि शिंदे यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहोळ अन् धंगेकरांमध्ये पेटला राजकीय वाद
भाजप नेते आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री प्रकरणाबाबत आरोप केले जात आहेत. यासंबंधित शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा व्हिडिओ देखील शेअर केला. यामध्ये मुरलीधर मोहोळ हे गोखलेची जाहिरात करत आहेत. यावरुन जोरदार टीका झाल्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र धंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांच्या साईटची जाहिरात करत आहेत. यामध्ये त्यांनी प्रोजेक्टची माहिती दिली. खासदार मोहोळ यांची व्हिडिओ शेअर करत रवींद्र धंगेकर यांनी लिहिले की, कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. सेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो.
कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचे जाणवते, कारण हे महाशय अगदी फ्लॅट दाखवण्याच्या जाहिराती देखील स्वतःच करायचे. तसेही 50% भागीदार म्हणजे कंपनीचा निम्मा मालक असतो. उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच… pic.twitter.com/fNeOKb5SWG — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 20, 2025
उगीच मंत्रीपदाच्या नियमामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सहा महिन्यांनी जड अंतकरणाने हे कंपनीतून बाहेर पडले. बर खरच बाहेर पडले की फक्त कागदोपत्री बाहेर पडलेत हे देव जाणे… कारण यांचे 50 टक्क्यांचे शेअर्स कुणाला दिलेत याच्याबद्दल कोणतीच माहिती यांनी दाखवलेली नाही. मुळे कंपनीच्या भविष्यातील 30,000 कोटींचा फायद्याच्या प्रोजेक्टमध्ये यांची इन्व्हॉलमेंट नसणार का…? काय वाटतं…? शाल पुणेकरांना वेड्यात काढताय, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी खासदार मोहोळ यांच्यावर केली.