Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर यांची निवड रद्द; पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

पंचवार्षिक निवडणुकीनंतर २२ सदस्यीय मिरज पंचायत समितीत भाजपचे ११ सदस्य निवडून आले होते. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी सभापती व उपसभापतीपदासाठी विशेष सभा घेण्यात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2026 | 09:18 AM
मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर यांची निवड रद्द; पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर यांची निवड रद्द; पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

Follow Us
Follow Us:

मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीवर अखेर विभागीय प्रशासनाने शिक्कामोर्तब निर्णय देत सभापती तन्वी कमलेकर यांची निवड रद्द केली आहे. पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांनी सभापतीपदाची निवड अवैध ठरवत नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने काँग्रेससह सत्ताधारी आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

पंचवार्षिक निवडणुकीनंतर २२ सदस्यीय मिरज पंचायत समितीत भाजपचे ११ सदस्य निवडून आले होते. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी सभापती व उपसभापतीपदासाठी विशेष सभा घेण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी शिवसेना (शिंदे गट)चे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण झाल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याप्रकरणी त्यांचे पुत्र अमर इंगळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Supriya Sule: ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’, अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या…

त्यानंतर झालेल्या निवडणुकीत तन्वी कमलेकर या अवघ्या एका मताच्या फरकाने (११ विरुद्ध १०) सभापतीपदी निवडून आल्या. मात्र, एका सदस्याला मतदानापासून वंचित ठेवल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही निवडणूक अवैध घोषित करून फेरनिवडणूक घेण्याची मागणी करत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीनंतर पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तांनी सभापतीपदाची निवड रद्द करत फेरनिवडणुकीचे आदेश दिले.

उपसभापतीपदाबाबत अद्याप स्पष्टता नाही

सभापतीपदासोबतच उपसभापतीपदाचीही निवड त्याच बैठकीत झाली होती. त्यावेळी सभापतीपदी तन्वी कमलेकर, तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या ललिता शेजुळ यांची निवड झाली होती. मात्र, विभागीय अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशात केवळ सभापतीपदाच्या निवडीबाबतच निर्णय देण्यात आला आहे. उपसभापतीपदाबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याने ते पद कायम राहणार की त्यासाठीही फेरनिवडणूक होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,’ सुषमा अंधारेंचं मोठं विधान; तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर सडकून टीका

Web Title: Election of miraj panchayat samiti chairperson tanvi kamlekar cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Panchayat Samiti Elections
  • sangli news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.