Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेतील अपघातानंतर १४ महिने मृत्यूशी झुंज; निलम शिंदेची अखेरची लढाई हरली; अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश

निलमच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. अशा परिस्थितीत एकुलत्या एक मुलीसाठी झगडणाऱ्या वडिलांची अवस्था अत्यंत हळवी करणारी होती.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 07, 2026 | 05:16 PM
Satara, Nilam Shinde, USA Accident, Organ Donation,

Satara, Nilam Shinde, USA Accident, Organ Donation,

Follow Us
Close
Follow Us:
  • निलम शिंदे यांचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अपघात
  • अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया
  • भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजता अमेरिकेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार
Satara News: वडगाव (उंब्रज) येथील निलम तानाजी शिंदे (वय ३५) हिची अमेरिकेत झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १४ महिने सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. डोक्याला गंभीर मार लागल्याने शस्त्रक्रिया करूनही तिचा मेंदू पूर्णपणे कार्यरत होऊ शकला नाही. दीर्घकाळ कोमामध्ये असलेल्या निलमचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निलमवर अमेरिकेत उपचार सुरू असताना तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पाईपमुळे संसर्ग (इन्फेक्शन) झाला. परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याने २८ मार्च रोजी तो पाईप काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली आणि अखेर तिने जगाचा निरोप घेतला.

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून

निलमने जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. तिच्या कुटुंबीयांनी तिची ही शेवटची इच्छा पूर्ण करत तिचे अवयवदान केले. या प्रक्रियेस सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागला. “करोडो भारतीयांचे आशीर्वाद तिच्यासोबत होते, पण नियतीपुढे सर्व हतबल ठरले,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता अमेरिकेत हिंदू धर्मीय परंपरेनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निलमची आत्या अमेरिकेत असल्याने अंतिम विधीची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

अपघात, संघर्ष आणि आशेची धडपड

१४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत झालेल्या अपघातात निलम गंभीर जखमी झाली होती. १६ फेब्रुवारीला कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या उपचारासाठी धडपड सुरू झाली. कॅलिफोर्नियातील रुग्णालयात तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र ती कोमामध्येच राहिली. दरम्यान, तिच्या वडिलांना तातडीने अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळण्यात मोठ्या अडचणी आल्या. कुटुंबाने अनेक दिवस प्रयत्न करूनही व्हिसा प्रक्रिया पूर्ण होत नव्हती.

समाजमाध्यमांपासून सरकारपर्यंत… मदतीची धाव

निलमच्या वडिलांनी समाजमाध्यमांवर मदतीचे आवाहन केल्यानंतर ही बाब देशभर गाजली. माध्यमांनीही या घटनेची दखल घेतल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र, तांत्रिक अडचणी आणि वेळेच्या मर्यादेमुळे वडील-मुलीची भेट होऊ शकली नाही.

जळगाव जिल्हा रुग्णालयात १२ कोटींचा ‘लॅब’ घोटाळा?एकाच दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण

वडिलांचा हंबरडा… अपूर्ण राहिली भेट

निलमच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. अशा परिस्थितीत एकुलत्या एक मुलीसाठी झगडणाऱ्या वडिलांची अवस्था अत्यंत हळवी करणारी होती. “मुलीच्या जीवासाठी आम्ही प्रत्येक दरवाजा ठोठावला, पण तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही,” अशी वेदना त्यांनी व्यक्त केली होती.

“अवयवदानातून निलम जिवंत राहील” — मामा

निलमचे मामा संजय विठ्ठल कदम म्हणाले, “२८ मार्चला डॉक्टरांनी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचे सांगितले. वडील भारतातच अडकले होते. त्यामुळे अमेरिकेत असलेल्या नातेवाईकांनीच अंतिम विधीची तयारी केली. निलमने अवयवदानाचा निर्णय घेतला होता, तो आम्ही पूर्ण केला. तिच्या जाण्याचे दुःख मोठे आहे, पण तिच्या अवयवांमुळे इतरांना जीवन मिळेल, हीच समाधानाची बाब आहे.” निलम शिंदेची कहाणी ही केवळ एका अपघाताची नाही, तर आशा, संघर्ष, प्रशासनातील अडथळे आणि शेवटी मानवतेचा संदेश देणाऱ्या अवयवदानाची आहे. तिच्या जाण्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले असले, तरी तिच्या निर्णयाने अनेकांना नवजीवन मिळणार आहे.

 

 

Web Title: End of a 14 month brave battle nilam shinde passes away in usa post horrific accident family opts for organ donation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Organ Donation
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन
1

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
2

पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल
3

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन
4

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.