Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Panchaganga River: पंचगंगा लवकरच प्रदूषणमुक्त होणार; पंकजा मुंडेंनी घेतली महत्वाची बैठक

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार आवाडे यांनी पंचगंगा प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित करत या संदर्भात तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2025 | 09:51 PM
Panchaganga River: पंचगंगा लवकरच प्रदूषणमुक्त होणार; पंकजा मुंडेंनी घेतली महत्वाची बैठक
Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी: कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणारी पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी, प्रदुषणमुक्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद आणि प्रदुषणास जबाबदार असणार्‍यांवर कारवाई अशा विविध विषयांवर मंगळवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याचा निर्णयही यावेळी झाला.

पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसाठी निधीची तरतूद करणे, पंचगंगा प्रदुषणाच्या निर्मुलनासाठी उपाययोजना करणे, पंचगंगा प्रदुषणमुक्त होऊन स्वच्छ होणेसाठी ठोस निर्णय घेणे आदी संदर्भात मंगळवारी दुपारी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार आवाडे यांनी पंचगंगा प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित करत या संदर्भात तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक झाली.

यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्‍न सातत्याने गंभीर बनत चालला आहे. वस्त्रनगरीसह नदीकाठावरील गावांना या प्रदुषणाचा फटका बसत आहे. पाणी पिण्यायोग्य असतानाही केवळ प्रदुषणामुळे त्याचा वापर करता येत नाही. हे सर्व रोखण्यासाठी पंचगंगा नदी तातडीने प्रदुषणमुक्त होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची ठोसपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेत पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासह आवश्यक त्या निधीची उपलब्धता करुन देण्याबाबत सकारत्मकता दर्शवत लवकरात लवकर प्रदुषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

 या बैठकीस आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडीक, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, आयुक्त, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील, नगर विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग व उद्योग-ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव, प्रधान सचिव (पर्यावरण), महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आदी उपस्थित होते.

Web Title: Envoirnment minister pankja munde take meeting for pollution in panchganga river kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • Ichalkaranji
  • kolhapur
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Kolhapur Municipal Elections : आघाड्यांमुळे इच्छुकांची लागणार कसोटी; कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
1

Kolhapur Municipal Elections : आघाड्यांमुळे इच्छुकांची लागणार कसोटी; कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त
2

Kolhapur : पाळीव कुत्र्यांच्या मालकांनो सावधान ! हे नियम मोडले तर थेट कुत्राच होणार जप्त

Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा; शासन आदेश जारी
3

Kolhapur Dasara Festival : कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा; शासन आदेश जारी

Madhuri Elephant case : आता माधुरी हत्तीचं पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय
4

Madhuri Elephant case : आता माधुरी हत्तीचं पुढे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.