Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वसामान्यांना बसतोय युद्धाचा फटका; जीवनावश्यक वस्तू महागल्याने बजेटच कोलमडलं

देशाला ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी आखाती देशातून आयात करावा लागतो. युद्धामुळे गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० ते ८० रुपयांची वाढ झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 02:31 PM
सर्वसामान्यांना बसतोय युद्धाचा फटका; जीवनावश्यक वस्तू महागल्या

सर्वसामान्यांना बसतोय युद्धाचा फटका; जीवनावश्यक वस्तू महागल्या

Follow Us
Close
Follow Us:

भंडारा : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता जाणवू लागले आहेत. जागतिक बाजारपेठ अस्थिर झाल्यामुळे घरगुती गॅस आणि खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता या जागतिक संघर्षाची मोठी किंमत मोजावी लागत असून, मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले.

देशाला ६० टक्क्यांहून अधिक एलपीजी आखाती देशातून आयात करावा लागतो. युद्धामुळे गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० ते ८० रुपयांची वाढ झाली असून, दर ९५० रुपयांच्या पार गेले आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही १५० रुपयांहून अधिक वाढ झाली. केवळ गॅसच नव्हे, तर खाद्यतेलाच्या किमतीतही प्रति लिटर १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींसमोर मोठा पेच निर्माण झाला.

उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागात लाखो महिलांना गॅस कनेक्शन मिळाले आहे. असले तरी आता सिलिंडरचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. केरोसीन आधीच बंद झाल्याने आणि गॅस महागल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुलीसाठी लाकडांची मागणी वाढली. तालुक्यातील जंगलांमध्ये वाघाची दहशत असतानाही महिलांना जीव मुठीत धरून सरपणासाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रक शेगडीचा वापर सुरू केला आहे. तर काही ठिकाणी चुली पेटल्याचे चित्र आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे सावट

कच्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पेट्रोल १०४.५७ रुपये तर डिझेल ९१.२७ रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर वाहतूक खर्च वाढून बाजारपेठेतील भाजीपाला आणि धान्य अधिक महागण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली ही महागाई सर्वसामान्यांची उपासमार करणारी ठरू शकते.

सणासुदीच्या काळात सिलिंडरची अवैध विक्री

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने पैशांचा मेळ कसा घालावा? असा प्रश्न पडला. सरकारने लाडकी बहीण योजनेतून मदत दिली असली तरी गॅसची दरवाढ सर्वसामान्यांचे बजेट बिघडवणारी असल्याचे म्हटले जात आहे. गॅस एजन्सींकडे सिलिंडरचा तुटवडा असल्याने ग्राहकांना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत आहे, ज्याचा फायदा घेत काही ठिकाणी घरगुती सिलिंडरची अवैध विक्रीही सुरू आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : देशात एक आठवड्याचाही साठा शिल्लक नाही; LPG गॅसबाबत बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

Web Title: Essential commodities become more expensive after war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • bhandara news
  • Iran-Israel War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.