Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

दहीहंडी आणि गणेशोत्सवावर पूर्वी बंधनं होती. मात्र, शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ती सर्व बंधनं हटवण्यात आली. आता आमचं सरकार असून दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 16, 2025 | 04:21 PM
Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
Follow Us
Close
Follow Us:

Devndra Fadnavis News:  ” मुंबई महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली. आता तिथे विकासाची हंडी लावली जाणार असून त्यातील लोणी सर्वसामान्य जनतेला वाटण्यात येईल, यावेळी मुंबई महानगर पालिकेमध्ये परिवर्तन अटळ आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुंबई महापालिका निडणुकांचे रणशिंगही फुंकले आहे. वरळीत गोविंदा पथकाने सादर केलेल्या ‘छावा मनोऱ्या’चे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत येथे हंडी फोडली. त्यानंतर घाटकोपर (पश्चिम) येथील आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेतील लोणी आतापर्यंत कुणी खाल्ले हे तुम्हाला माहिती आहे. ते तुम्ही माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण जनतेला माहिती आहे, हे लोणी कुणी खाल्लं असं म्हण त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोलाही लगावला. तसेच. महाराष्ट्रात आज पारंपरिक उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. संपूर्ण मुंभईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, पण तरीही गोविंदांच्या उत्सवाचा पाऊस त्याहून मोठा आहे.’ असं कौतुक करत त्यांनी गोविंदा पथकांचा उत्साह द्विगुणित केला.

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बोलताना म्हटले, “दहीहंडी आणि गणेशोत्सवावर पूर्वी बंधनं होती. मात्र, शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ती सर्व बंधनं हटवण्यात आली. आता आमचं सरकार असून दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होत आहे.” दुसरीकडे मनसे व शिवसेनेच्यावतीनेही मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात राजन विचारेंकडून निष्ठेची दहीहंडी फोडली जाणार आहे.

राजधानी मुंबईसह उपनगरातील दहीहंडी उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नागरिक उंचच उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी, तसेच सेलिब्रिटींचा जल्लोष अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईत गर्दी करतात. सोशल मीडियावरदेखील मुंबईच्या दहीहंडीची चर्चा रंगते.

Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवात राजकीय रंग अधिक गडद दिसून येत आहे. शिवसेना, मनसे आणि भाजपच्यावतीने हा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसभरात मुंबईतील तब्बल 10 ते 15 दहीहंडी उत्सवांना भेट देणार असून, दुपारी 1 वाजता वरळीतील ‘परिवर्तन दहीहंडी उत्सवा’पासून त्यांच्या भेटीची सुरुवात झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी यंदा मुंबई महापालिकेत परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थर लावत विक्रम नोंदवला आहे. घाटकोपर येथील मनसेच्या दहीहंडी उत्सवात या पथकाने दहा थरांचा मानवी मनोरा रचून उपस्थितांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी ठाण्यातील वर्तक नगर येथील प्रो. गोविंदा स्पर्धेतून जय जवान पथकाला बाद ठरवण्यात आले होते. मात्र, आज दहीहंडी दिनी या पथकाने भव्य मनोरा रचत आपली ताकद आणि कौशल्य प्रभावीपणे दाखवून दिले.

 

Web Title: We broke the pot of sin in mumbai municipal corporation fadnavis taunts thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • BMC Elections
  • devendra fadnavis
  • Ram Kadam
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
1

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

‘हो मी फोन केला’… देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आली रंगत
2

‘हो मी फोन केला’… देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आली रंगत

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र
3

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.