नागपूर : सध्या शिंदे सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे, सत्तांतरानंतर शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता या सरकारला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती पण उलटं घडलं. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबाहेर राहणार असल्याची घोषणा करुन केंद्रीय नेतृत्त्वाच्या आदेशानं उपमुख्यमंत्री बनले. पण सरकारमध्ये फडणवीस निर्णय प्रक्रियेत अग्रेसर असतात. हिवाळी अधिवेशनाचे सूप उद्या वाजणर आहे, याचवेळी नागपूरमध्ये विधानभवनाच्या बाहेर दोन मोठे कटआऊट्सवरुन जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आह. या कटआऊट्समध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो लहान दाखवला आहे तर, देवेंद्र फडणवीस यांचा कटआऊटवर मोठा फोटो लावण्यात आल्यानं यावरुन चर्चा होत असून, यातून कोणता संदेश भाजपाला द्याचा आहे. अशी चर्चा सुरु आहे.
[read_also content=”बापरे! साईचरणी वर्षभरात जमले “एवढ्या कोटींचे दान”, रोज सरासरी एक कोटीपेक्षा अधिक देणगी; वार्षिक आकडा ऐकून थक्क व्हाल… https://www.navarashtra.com/maharashtra/sai-baba-collected-so-many-crores-of-donations-during-the-year-averaging-more-than-a-crore-a-day-357704.html”]
भाजपाकडून ताकद दाखवण्याचा प्रयत्न?
दरम्यान, या मोठ्या पोस्टमधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच जरी फोटो असले तरी, देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या फोटोमुळं सरकारमध्ये फडणवीसांची ताकद अधिक आहे, असं तर भाजपाला यातून दाखवायचे आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे, कारण जरी सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा सरकारमध्ये त्यांचे वजन मुख्यमंत्रीपेक्षा बिल्कुल कमी नाहीय, हा संदेश भाजपा देत असल्याची चर्चा सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर अशा कालावधीमध्ये घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. त्यामुळं नागपुरात कोरोनानंतर पहिल्यांदाच अधिवेशन होत असल्यामुळं अनेक पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यावेळी तिथं फक्त एकनाथ शिंदे यांचं कटआऊट होतं. हे कटआऊट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि किरण पांडव यांच्याकडून लावण्यात आलं होतं. मात्र सध्या लावण्यात आलेलं मोठं कटआऊट्समध्ये मुख्यमंत्री लहान व उपमुख्यमंत्री मोठे कसे, यावरुन चर्चा सुरु आहे.