Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतरही कुटुंबियांची परवड; लाभासाठी करावा लागतोय अडचणींचा सामना

जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने 2005 पूर्वी असलेली जुनी पेन्शन लागू आहे व यानंतर पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या पेन्शनधारकांना अंशतः समस्यांचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारक सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा महिला किंवा अविवाहित मुलीला पेन्शन शासनाला देय असते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 22, 2024 | 01:37 PM
पेन्शनधारकांच्या वारसांना अडचणींचा फटका

पेन्शनधारकांच्या वारसांना अडचणींचा फटका

Follow Us
Close
Follow Us:

शिरपूर जैन : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या जुन्या पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगातून बहुतांश समस्या सुटलेल्या आहेत. मात्र, पेन्शनधारकांच्या विधवा महिलेची किंवा अविवाहित मुलींना तांत्रिक अडणींचा सामना करावा लागतो. या त्रुटी दूर झाल्यास वृद्धापकाळात बँकेकडे फेरे मारावे लागणार नाहीत.

हेदेखील वाचा : बंगळुरुत श्रद्धा वालकर हत्येप्रकरणाची पुनरावृत्ती; तरूणीची हत्या करून 30 तुकडे केले अन्…

जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने 2005 पूर्वी असलेली जुनी पेन्शन लागू आहे व यानंतर पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या पेन्शनधारकांना अंशतः समस्यांचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारक सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा महिला किंवा अविवाहित मुलीला पेन्शन शासनाला देय असते. यासाठी किचकट प्रक्रियेनंतर पेन्शन वारस महिला, मुलीच्या नावावर होते, अर्थातच जे वारस असतात, त्यांच्या नावावर पेन्शन करण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये मात्र वयोवृद्ध महिला व अविवाहित किंवा मतिमंद मुलींना फार त्रास सहन करावा लागतो.

यासाठी शासनाने साधे आणि सरळ नियम करून पेन्शन संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नावावर करणे अपेक्षित आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाऱ्या पास सवलतीमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

हाताच्या ठशांचाही विषय त्रासदायक

जुने पेन्शनधारक ज्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक आहे, त्यांच्या बोटाचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे ते रेकॉर्डशी जुळत नाहीत. त्यांना पेन्शन नाकारले जाते किंवा अर्ज करून विलंब लागतो. काही असाध्य आजारांनी त्रस्त आहेत. त्यांनाही बँकेत येण्याची सक्ती केली जाते. पेन्शन खाते दोघांच्या संयुक्त नावे नसते. त्यामुळे मृत्यूनंतर वारसाला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतो.

हेदेखील वाचा : विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार! निवडणूक आयोगाचा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा

Web Title: Family member of deceased is in tension due to pension fund nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 01:37 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim Crime News: वाशिम हादरलं! जीवे मारण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर अनेकदा अत्याचार
1

Washim Crime News: वाशिम हादरलं! जीवे मारण्याची धमकी देत २० वर्षीय तरुणीवर अनेकदा अत्याचार

Crime News Updates : वाशिम हादरलं! 20 वर्षीय तरुणीवर केले अनेकदा अत्याचार
2

Crime News Updates : वाशिम हादरलं! 20 वर्षीय तरुणीवर केले अनेकदा अत्याचार

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत शारीरिक अत्याचार; ४० वर्षीय विवाहितेची आत्महत्या
3

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत शारीरिक अत्याचार; ४० वर्षीय विवाहितेची आत्महत्या

वाशिमच्या रिसोड तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; घरांचे छप्पर उडाले, संसार उघड्यावर पडले
4

वाशिमच्या रिसोड तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; घरांचे छप्पर उडाले, संसार उघड्यावर पडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.