Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Washim rain Ekburji dam water level: वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यांतील अनेक लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 14, 2026 | 06:29 PM
dam

dam

Follow Us
Follow Us:
  • ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ
  • एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
  • दमदार पावसाची आवश्यकता
वाशिम: जिल्ह्यात गेल्या ४ दिवसापासून पावसाने काही भागांत जोरदार हजेरी लावल्याने अनेक लघु प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली. विशेषतः वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाचा सकारात्मक परिणाम प्रकल्पांवर दिसून आला. मात्र, मानोरा आणि कारंजा तालुक्यांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

Buldhana News: शाळेसाठी आरक्षित भूखंड; जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले सखोल चौकशीचे आदेश

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट कायम असून, पावसाळ्याचे २ महिने आणि १३ दिवस उलटल्यानंतरही अनेक प्रकल्प अपेक्षित पातळीपर्यंत भरलेले नाहीत. जिल्हातील काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असला तरी सर्वच भागात एकसमान पर्जन्य झालेला नाही. लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पातील जलसाठा २५.५६ टक्क्यांवरून थेट ३६.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील जलसाठाही १७.४३ टक्क्यांवरून १९.२१ टक्क्यांपर्यंत वाढला. मानोरा आणि कारंजा तालुक्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मानोरा तालुक्यात केवळ १३.११ मिलिमीटर, तर कारंजा तालुक्यात ४.१३ मिलिमीटर पावसाची नोंद इाली. त्यामुळे या भागातील प्रकल्पांमध्ये अद्याप अपेक्षित जलवाढ झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील पावसाचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहत नाही. वाशिममधून वाहणारे पाणी अकोला जिल्ह्यातील महान आणि पिंजर धरणांकडे जात असल्याने अकोला जिल्ह्यातील नागरिकांचेही वाशिममधील पावसाकडे विशेष लक्ष लागलेले असते. आता उर्वरित पावसाळयात निसर्ग कितपत साथ देतो आणि प्रकल्पांतील जलस्राठ्‌यात किती चढ होते, याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

दमदार पावसाची आवश्यकता

जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमध्ये अद्यापही शून्य टक्के जलसाठा असल्यांचे वास्तव समोर आले आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ३५ ते ४५ टक्क्यांदरमयान जलसाठा आहे. अनेक प्रकरत्यांना अद्याप शून्याचा टप्पा ओलांडता आलेला नसल्याने भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता नाकारता यंत नाही, सध्या झालेला पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरत असला तरी चरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील जलस्थितीत मोठा बदल होऊ शकतो.

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Web Title: Washim rainfall ekburji water storage monsoon update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Rain Update
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
1

Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या; आरोपीसह आई-वडिलांनाही अटक
2

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या; आरोपीसह आई-वडिलांनाही अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.