धक्कादायक ! कूलरचा करंट लागून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (File Photo : Death)
लाखांदूर : दुपारच्या सुमारास शेतातील पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाणी काढताना विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी 3 वाजताच्या सुमारास तालुक्यातील साखरा गावातील शेतशिवारात घडली. या घटनेत सुरेश बांगरे (49) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
शेतकऱ्याची साखरा येथे 3 एकर शेती असून, 2 एकर शेती त्याने ठेक्याने घेतली होती. सध्या धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीड नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी ठेक्याने केलेल्या शेतात धानपिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी गेला होता. यावेळी औषध फवारणीसाठी लागणारे पाणी काढताना त्याचा पाय कचऱ्यात अडकल्याने तोल जावून शेतकरी खोल विहिरीत पडला. त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
दिघोरी/मो पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाणेदारासह इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ऐन दसऱ्याच्या सणाला त्यांच्या कुटुंबीयांवर या मृत्यूमुळे मोठा आघात झाला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.